अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावामध्ये एका गणेशोत्सव मंडळ व युवक काँग्रेसच्या वतीने गणपती विसर्जन्या दरम्यान पूरग्रस्तांना मदतीच्या नावावखाली नाच गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलं असल्याचा प्रकार ऊजेडात आला आहे. विशेष म्हणजे या नाच गाण्याचा कार्यक्रमाला बाहेरून पाच ते सहा तृतीयपंथीयांना आयोजकांकडून बोलावण्यात आले होते. सुरुवातीला या तृतीयपंथीयांचा नेरपिंगळाई येथे रोड शो करण्यात आला होता. या रोड शो व स्टेज शो सुरू असताना गावातील युवक व युवती मात्र रोष व्यक्त करत होते
दरवर्षी किन्नर समाजातील लोकांना नेरपिंगळाई गावात बोलवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी पूरग्रस्त लोकांना मदतीच्या नावाखाली चक्क अर्धनग्न तृतीय पंथीयांना चारचाकी गाडीवर चढवून त्यांना हिंदी चित्रपत्रातील गाण्य़ांवर नृत्य करण्यास सांगितले गेले. संपूर्ण गावातून हा रोड शो केल्यामुळे लोप पावत चाललेल्या भारतीय संस्कृतिची खिल्ली उडविल्याचे गावातील सामान्य लोकांचे म्हणणे आहे.त्यामुळे गावतील लोकांनी देखील रोष व्यक्त केला.
एकेकाळी लोकमान्य टिळकांनी सर्व धर्मीय लोकांना एकत्र आणून सार्वत्रिक गणेश उत्सवाला सुरुवात केली. यामध्ये भारतीय संस्कृती चे देखील जतन केले जाते. मात्र पूरग्रस्त लोकांच्या नावाखाली छमछम कार्यक्रम लोकांना कोणता संदेश द्यायचा आहे असे देखील बोलल्या जात आहे.
या गाण्यात सायंकाळच्या वेळी स्टेज वर युवक काँग्रेसच्या नावाखाली देखील तृतीयपंथी नृत्य सादर करण्यात आले. स्टेजवर लागलेल्या ब्यानरवर आमदार यशोमती ठाकूर यांचा देखील फोटो असल्याने त्यांनीच या कार्यक्रमाला पाठबळ दिले नाही ना ? हा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.