करदात्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! मार्च-एप्रिलचा टॅक्स उशिरा भरला तरी लागणार नाही दंड

नवी दिल्ली । सरकारने करदात्यांनसाठी मदत जाहीर केली आहे. मासिक रिटर्न जीएसटीआर -3 बी आणि मार्च-एप्रिल महिन्यात कर भरन्यासाठी उशीर झाल्यास सरकारने विलंब शुल्क माफ केले आहे. एवढेच नव्हे तर उशीरा कर भरणाऱ्यांसाठी व्याजदरातही कपात केली आहे. सरकारने 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांना मासिक सारांश रिटर्न जीएसटीआर -3 बी दाखल करण्यासाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदत दिली आहे. अशे करदाते उशीर शुल्क न भरता या 15 दिवसांत कर भरू शकतात.

यांना मिळतील 30 दिवस:

गेल्या आर्थिक वर्षात ज्यांची उलाढाल पाच कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांना मार्च आणि एप्रिलमध्ये B बी रिटर्न भरण्यासाठी 30 अतिरिक्त दिवस देण्यात आले आहेत.या लोकांना ना तर उशिर शुल्क द्यावा लागणार आहे ना व्याज. या करदात्यांसाठी प्रारंभिक 15 दिवसांचा व्याज दर शून्य असेल. त्यानंतरच्या 15 दिवसांसाठी व्याज 9 टक्के राहील. 30 दिवसानंतर व्याज दर 18 टक्के होईल.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) 1 मे रोजी एक अधिसूचना जारी केली असून ही सूट 18 एप्रिलपासून लागू होईल. तसेच एप्रिल सेल्स रिटर्न जीएसटीआर -1 दाखल करण्याची मुदत 11 मे च्या मूळ तारखेपासून 26 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. जीएसटीआर -4 विक्री रिटर्न्स भरणाऱ्या कंपोझीट डीलर्ससाठी, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 मेपर्यंत म्हणजे एक महिन्याने वाढविण्यात आली आहे.

You might also like