Health Tips| हिवाळा ऋतू सुरू झाला की सर्दी खोकल्याचा त्रास देखील सुरू होतो. त्यामुळे यावर उपाय मिळवण्यासाठी आपण सतत डॉक्टरांकडे जातो. परिणामी ज्यामुळे आपला खर्च देखील जास्त होतो. परंतु सर्दी खोकला बरा करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना ऐवजी आयुर्वेदिक काढा पिला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. तसेच इतर आजार देखील छु मंतर होतील. त्यामुळे सर्दी खोकल्यावर उपाय करणारा हा काढा कसा बनवायचा जाणून घ्या.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक
तुळशी
आले
लवंग
हळद
दालचिनी
गुळ
काढा बनवण्याची पद्धत {Health Tips}
हा आयुर्वेदिक काढा तयार करण्यासाठी दोन कप पाण्यात वरील सर्व घटक टाका. त्यानंतर 20 ते 25 मिनिटे हे पाणी उकळून घ्या. दोन कप पाणी ज्यावेळी एक कप झालेले वाटेल तेव्हा गॅस बंद करा. त्यानंतर हे सर्व मिश्रण गाळून घेऊन. कोमट असताना प्या. या आयुर्वेदिक काढायामुळे तुमची सर्दी आणि खोकला लगेच बरा होईल.
आयुर्वेदिक काढ्याचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर हा आयुर्वेदिक काढा तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करून द्या. तसेच हा काढा पिल्यानंतर श्वसन प्रक्रिया सुरळीत होते. छातीमध्ये झालेले कफ दूर होतात. सर्दी खोकल्यासाठी तसेच घसा दुखत असला तर हा काढा रामबाण उपाय
(Health Tips) ठरतो.