हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स, ऑफर्स, आणि सुविधा आणल्या आहेत. मात्र या सगळ्यात आज बँक ऑफ महाराष्ट्र गृह कर्जाच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बऱ्याच काळानंतर बँकेने गृह कर्जाचे दर कमी केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ने घेतलेल्या निर्णयामुळे घर खरेदी इच्छिणाऱ्या व्यक्तींना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी बँक ऑफ महाराष्ट्रने सांगितले आहे की, त्यांनी गृह कर्जाचे दर १५ bpc ने ८.३५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कमी व्याजदर आणि गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफीचा दुहेरी फायदा घेता येणार आहे. तसेच ग्राहकांच्या पैशांची बचत देखील होणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या निर्णयानंतर, बँकेच्या ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या सुविधा मिळणार आहेत. गृह कर्जावरील व्याजदर कमी करून बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. खास म्हणजे ही ऑफर दिल्यामुळे, ग्राहकांना नवीन वर्षामध्ये आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. तसेच त्यांना बँकेचे कर्ज देखील कमी भरावे लागणार आहे. यापूर्वी गृहकर्जावर व्याजदर जास्त असल्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे परवडत नव्हते.