या देशात नाही एकही नदी; फक्त 2 दिवस पडतो पाऊस, मग प्यायला पाणी कुठून आणतात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये नदीला खूप पवित्र मानले जाते. आणि त्यामागे अनेक शास्त्रीय कारणे देखील आहे. कारण गावोगावी ही नदीच प्रत्येकापर्यंत पाणी पोहचवते. पाणी हे आपले जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच प्राचीन काळापासूनच नदीच्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत. परंतु आपल्या जगात असा एक देश आहे. ज्या देशात एकही नदी वाहत नाही. त्या देशातील भूजल पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे. तसेच एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की, या देशातील पाण्याची पातळी कमी झाल्याने काही वर्षातच इथे भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. या गावात नदी नसल्याने अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागते. आता हा देश कोणता आहे? हे आपण जाणून घेऊया

सौदी अरेबिया हा एक असा देश आहे, ज्या देशात एकही नदी किंवा तलाव नाही सौदी अरेबियामध्ये पाऊस पडण्याचे प्रमाण देखील अगदी कमी आहे. या देशामध्ये प्रत्येक वर्षी एक किंवा दोन दिवस पाऊस पडतो. या देशात पुरेसा पाऊस न झाल्याने तेथील भूजल पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे. आणि या देशातील भूजल पातळी लवकर संपुष्टात येईल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.

आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की, या देशात केवळ एक ते दोन दिवस पाऊस पडतो. तसेच या देशात एकही नदी वाहत नाही. मग या देशातील लोक पाणी कोणते पितात? तर सौदी अरेबियामध्ये पिण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जातो. समुद्रातील खारट पाणी हे पिण्यायोग्य बनवले जातात. यावर मोठी प्रक्रिया देखील केली जाते. परंतु ही प्रक्रिया खूप महागडी आहे. सौदी अरेबियामध्ये एकही नदी नसली तरी हा देश दोन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. या सौदी अरेबियाच्या पश्चिमेला लाल समुद्र आहे, तर पूर्वेला पर्शियन खाडी आहे. या दोन्ही समुद्राला व्यापारी खूप जास्त महत्व आहे. या समुद्रातील पाणी पिण्यायोग्य करून ते वापरले जाते.

या देशांमध्ये जास्त पाऊस न पडल्याने येथील भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला पाण्यावर जास्त पैसा खर्च करावा लागतो. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सौदी अरेबिया दरवर्षी त्यांच्या जीडीपीतील जवळपास दोन टक्के खर्च हा पाण्यावर करत असते. तेथील अनेक लोक आजही पाण्यासाठी विहिरीचा वापर करतात. परंतु भूजल पातळी अत्यंत खालवलेली असल्याने त्या ठिकाणी त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.