येत्या दिवाळीला 786 नंबरची ‘ही’ नोट तुम्हाला करेल मालामाल! कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपल्यालाही नाणी आणि नोटा जमा करण्याची आवड असेल तर आपण आता सहजपणे लक्षाधीश होऊ शकता. यावर्षी दिवाळीत आपल्या जुन्या नोटा आणि नाणी आपले नशिब उजळवू शकते. तर आता आपणास त्वरित 786 सीरिजच्या नोटा शोधण्यास सुरुवात करा. जर आपल्याकडे या नोटांची सिरीज असेल तर आपण चांगली कमाई करू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त ईबेच्या वेबसाइटवर जाण्याची गरज आहे आणि तुमच्या नोटेसाठी ई-बोली लावून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. यासाठी आपल्याकडे कोणती नोट असावी लागेल ते जाणून घेउयात…

3 लाख रुपये मिळू शकतात
इंडियन करंसीच्या दुर्मिळ नोटांसाठी ईबेवर बोली लागत आहे. ईबे नेहमीच अशा वेगवेगळ्या नोटांसाठी बोली लावते. कोणताही सामान्य माणूस या बोलीमध्ये भाग घेऊ शकतो. 786 सीरिजच्या या नोटांवर आपण 3 लाख रुपयांपर्यंत बोली लावू शकता.

आपण ‘या’ नोटांद्वारेही पैसे कमवू शकता
जर आपल्याकडे असलेल्या नोटेवर 786 नंबर नसेल तरीही आपण सारख्या नंबरच्या नोटांमधून देखील पैसे मिळवू शकता. नुकतीच दहा रुपयांची एक नोट सापडली ज्यामध्ये नंबरची सीरीज सारखीच होती. या नोटांसाठी बोली लावणाऱ्या ग्राहकांना 3300 रुपये मिळाले. तर तुम्हीही अशा खास नोटांद्वारे पैसे कमवू शकता.

1 रुपयांची ‘ही’ नोट मिळवून देईल 10,000 रुपये
1917 मध्ये एक रुपयाची नोट छापली गेली होती. या नोटेची किंमत सध्या 10,250 रुपये आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे अशी नोट असेल तर तुम्हाला त्या बोलीवर 10,250 रुपये मिळतील.

1951 मध्ये छापली गेलेली 10 रुपयांची नोट
त्याचप्रमाणे, 10 रुपयांची एक जुनी नोट आहे, जी 1951 मध्ये छापली गेली. ही नोट पांढर्‍या आणि फिकट निळ्या रंगाची आहे. जर आपल्याकडे ही नोट असेल तर ती 1 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळवून देईल. ही नोट खूपच जुनी असल्याने ती फारच दुर्मिळ मानली जाते.

तसेच वैष्णोदेवीच्या 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांमधूनही पैसे मिळवता येईल
आपल्याकडे माता वैष्णोदेवीची 5 आणि 10 नाणी असल्यास आपण ते विकूनही पैसे कमवू शकता. ही नाणी 2002 मध्ये जारी करण्यात आलेली होती. माता राणीच्या चित्रामुळे अनेक लोकं या नाण्यांना खूप भाग्यवान मानतात. हिंदू धर्मात माता वैष्णो देवीची पूजा केली जाते. त्यामुळे अशा नाण्यांसाठी लोक कोट्यावधी रुपये खर्च करीत आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 8080340221 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा.