Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!

Bank FD
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता सरकारी बँक असलेल्या पंजाब आणि सिंध बँकेने देखील आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. Bank FD

Punjab and Sind Bank post Rs 301 cr net profit in Q3 versus year-ago loss |  Business Standard News

22 ऑगस्ट 2022 पासून नवीन दर लागू होणार

हे लक्षात घ्या कि, पंजाब अँड सिंध बँके कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडी आणि बचत खात्यांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन दर लागू केले जातील. बँकेने 31 दिवसांपासून ते 10 वर्ष कालावधीच्या एफडीसाठीचे दर वाढवण्यात आले आहेत. Bank FD

Want to control your spending? Try the 30-Day Rule | Mint

असे असतील एफडीवरील नवीन व्याज दर

7 ते 30 दिवस – 2.80 टक्के
31 ते 45 दिवस – 3.00 टक्के
46 ते 90 दिवस – 3.80 टक्के
91 ते 120 दिवस – 3.95 टक्के
121 दिवस ते 179 दिवस – 4.00 टक्के
180 दिवस ते 269 दिवस – 4.50 टक्के
270 दिवस ते 364 दिवस – 4.65 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.65 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे – 5.80 टक्के
3 वर्षे ते 10 वर्षे – 5.75 टक्के

Independence Day Special FD Scheme Launched By SBI Bank Of Baroda And Axis  Bank With Higher Interest Rates | Independence Day Special FD Scheme: आजादी  के अमृत महोत्सव पर इन बैंकों ने

अनेक बँकांनी एफडीचे (Bank FD) दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच ICICI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, IDFC फर्स्ट बँक सारख्या बँकांनी देखील त्यांच्या एफडी वरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर हे दर वाढवले गेले आहेत. हे लक्षात घ्या कि, अलीकडेच, RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://punjabandsindbank.co.in/content/interestdom

हे पण वाचा :

LIC च्या ‘या’ योजनेमध्ये दररोज 29 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!

3 महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मध्ये मिळवण्याची संधी !!!

Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Aadhar Card मध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या !!!

Stock Market : येत्या आठवडय़ात ‘हे’ घटक ठरवतील शेअर बाजाराची दिशा !!!