Farming Tips : भारतात मोठ्या प्रमाणात लोक केळी लागवड करत आहेत. अशा वेळी केली लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. जर तुमच्याकडेही केळीचे शेत असेल किंवा तुम्ही नवीन केली लागवड करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता तुम्ही तुमचे केळीचे उत्पन्न वाढवू शकता.
यासाठी तुम्हाला आज आम्ही उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याची पद्धत सांगणार आहे. या शेतकऱ्याने त्याच्या शेतात केळी लागवड करून प्रत्येक रोपाला इंजेक्शन दिले आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.मनिष मिश्रा यांनी सांगितले की, केळी पिकात होणाऱ्या ‘पनामा विल्ट’ या रोगाला पनामा रोग असेही म्हणतात. हा आजार केवळ भारतातच नाही तर जगभरातील १७ देशांमध्ये पसरला होता. या आजाराला केळीचा कर्करोग म्हणतात. या आजरामुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
हा रोग टाळण्यासाठी प्रयोगशाळेत केळीची टिश्यू कल्चर रोपे तयार करताना इंजेक्शन दिले जाते, त्यामुळे हा रोग पिकात होत नाही. शेतकरी आपल्या शेतात ही रोपे लावतात तेव्हा त्यांचे प्रश्न सुटतात. हा रोग रोखण्यासाठी, ICAR अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी एक जैव-कीटकनाशक तयार केले आहे, ज्याचे नाव ICAR-Fugikant आहे. या जैव कीटकनाशकाच्या सहाय्याने आज हा रोग जवळपास आटोक्यात आला आहे, त्यामुळे भारतात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
तसेच मुख्य शास्त्रज्ञ मनीष मिश्रा म्हणाले की, या रोगामुळे उत्तर प्रदेशातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी केळीची लागवड करणे बंद केले होते, तर केळी हे एक फळ आहे जे लोकांची भूक भागवण्यासही मदत करते. कारण हे एक जड फळ आहे आणि लोकांचे आरोग्य देखील खूप सुधारते. आता विशेष प्रकारच्या टिश्यू कल्चरद्वारे केळीची रोपे तयार केली जातात. झाडांना लसीकरण केले जाते, ज्यामुळे झाडे पूर्णपणे रोग-प्रतिरोधक बनतात.
पनामा विल्ट रोगाने या राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील केळी पिकांना पनामा रोगाचा सर्वाधिक फटका बसला आहे. डॉ. मनीष यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पनामा रोग इतका धोकादायक आहे, ज्यामुळे एक विचित्र प्रकारची बुरशी पसरू लागते. ट्रॉपिकल रेस-4 नावाच्या बुरशीमुळे केळीचे पीक नष्ट होते.
जगातील 80% केळी पिकांवर याचा परिणाम झाला, म्हणून याला केळीचा कर्करोग म्हणतात. ही बुरशी झाडाच्या मुळांवर हल्ला करतात आणि एकदा संक्रमित झाल्यानंतर झाडाला पाणी आणि इतर पोषक तत्व मिळू शकत नाहीत. केळीची रोपे सुकतात आणि देठ काळे होऊ लागते. काही काळानंतर वनस्पती मरते. अशा प्रकारे हा रोग एका झाडापासून दुसऱ्या झाडात पसरू लागतो.