‘हा’ आहे नारायण राणेंचा दुसरा उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |    महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली होती. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. नारायण राणे यांनी औरंगाबादमधून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवतील, असे जाहीर केले आहे.

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैर यांचा पराभव करण्यास सुभाष पाटील योग्य उमेदवार असल्याचे म्हंटले आहे. सुभाष पाटील खैर यांना पराभूत करून औरंगाबाद येथे निवडून येतील असा दावा राणे यांनी केला आहे. राज्यात किमान पाच जागा लढवणार असल्याची घोषणा राणे यांनी केली आहे.आचारसंहिता जाहीर झाल्यावर इतर उमेदवार सुद्धा घोषित करू, असे राणेंनी सांगितले आहे.

राणे यांनी भाजपविरोधात उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले होते मात्र शिवसेनेविरोधात आपले उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेविरोधात स्वाभिमानचा असणार हे या उमेदवारीवरून स्पष्ट होत आहे.राणे यांनी शिवसेना भाजप युतीवर सुद्धा टीका केली. भाजप – शिवसेना युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे.

 

इतर महत्वाचे –

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांच्यात ‘ही’ चर्चा झाली…

भारिप प्रणित – सम्यक विद्यार्थी आंदोलन, शाहु कॉलेज शाखेचं उद्घाटन…

गडचिरोलीत ११ हजार महिला व विद्यार्थ्यांनी केली साडेसहा कि.मी.ची मानवी साखळी…

Leave a Comment