पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना 10 हजारांच्या गुंतवणुकीवर देईल 16 लाखांचा फायदा, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पोस्ट ऑफिस योजनांमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न देखील मिळतो. पोस्ट ऑफिस लहान बचत योजना जास्त चांगल्या आहेत. यामध्ये कमी खर्चात गुंतवणूक करून पैसे कमवले जातात. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट. यामध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो.

पोस्ट ऑफिस RD स्कीम काय आहे?
एकूणच, या योजनेद्वारे, तुम्ही खूप कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. या व्यतिरिक्त, आपले पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतील. यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही किती गुंतवणूक करू शकता यावर जास्तीची मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट खाते ही लहान हप्ते चांगल्या व्याजासह जमा करण्याची सरकारी गॅरेंटी असलेली योजना आहे.

तुम्हाला किती व्याज मिळेल जाणून घ्या
पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले RD खाते 5 वर्षांसाठी असते. यापेक्षा कमी कालावधीसाठी ते उघडता येत नाही. प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या रकमेवर व्याज मोजले जाते. मग ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह तुमच्या खात्यात जोडले जाते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार सध्या RD योजनेवर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत सर्व लहान बचत योजनांमध्ये व्याज दर जाहीर करते.

जर तुम्ही 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 16 लाखांपेक्षा जास्त मिळतील
जर तुम्ही पोस्ट ऑफिस RD योजनेमध्ये दरमहा 10 हजार रुपये गुंतवलेत, तेही 10 वर्षांसाठी, तर त्याला मॅच्युर झाल्यावर 16,26,476 लाख रुपये मिळतील.

RD खात्याबद्दल काही खास गोष्टी
जर तुम्ही RD चा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्त्यात उशीर झाल्यास तुम्हाला दरमहा एक टक्के दंड भरावा लागेल. यासह, जर तुम्ही सलग 4 हप्ते जमा केले नाहीत तर तुमचे खाते बंद होईल. मात्र, जेव्हा खाते बंद होते, तेव्हा पुढील 2 महिन्यांसाठी पुन्हा ऍक्टिव्हेट केले जाऊ शकते.

Leave a Comment