हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशभरातील इतर भागातही वंदे भारत सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून हालचाली चालू आहेत. अशातच वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. आता वंदे भारत ट्रेनमध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटलही मिळणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणारा नाही.
देशभरातील विविध भागात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेक खास सुविधा देण्यात येत आहेत. तसेच त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी व्हावा यासाठी विविध प्रयोग केले जात आहे. यातीलच एक भाग म्हणून वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना फ्रीमध्ये पाण्याची बॉटल देण्याची सोय करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी एकच नाही तर पाण्याची दुसरी बॉटलही घेऊ शकतात. यासाठी रेल्वे विभागाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
पाण्याची होणार बचत
रेल्वे भागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशातील विविध शहरांमध्ये सुमारे 50 पेक्षा अधिक वंदे भारी ट्रेन सुरू आहे. आजवर या ट्रेनमध्ये प्रवाशांना एक लिटर पाण्याची बॉटल दिली जात होती. त्यामुळे अनेक प्रवासी बॉटलमधील थोडे पाणी पिऊन उर्वरित पाणी तसेच ठेवत होते. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. हेच पाणी वाया जाऊ नये म्हणून आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी रेल्वेने वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांचा आकार लहान करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे प्रवासी आपल्या गरजेनुसार पाण्याची बॉटल मागवू शकतात. यासाठी त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. महत्वाचे म्हणजे, रेल्वे विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे ट्रेनमध्ये दररोज वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे.