गृहकर्जावर SBI पुरवतेय ‘ही’ खास सुविधा; आता तुमच्या क्रेडिट स्कोरवर ठरणार गृह कर्जाचे व्याजदर….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्य बँकांप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या मार्जिनल कॉस्ट लेन्डिंग रेट अर्थात MCLR वर कुठल्याच प्रकारे बदल केला नाही. आय सी आय सी आय बँक, बँक ऑफ बडोदा , युनियन बँक यांसारख्या अन्य बँकांनी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI ) नंतर आपल्या मार्जिनल कॉस्ट लेन्डिंग रेट अर्थात MCLR मध्ये कुठल्याच प्रकारचा बद्दल केला नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI ) ने एप्रिलच्या मॉनिटरी पॉलिसी नंतर रेपो रेट वाढवला नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)चा ओव्हर नाईट मार्जिनल कॉस्ट लेन्डिंग रेट अर्थात MCLR ७. ९० % आहे. तसेच १ महिन्याचा MCLR हा ८. १० % सहा महिन्यांचा MCLR ८. ४० % एक वर्षाचा MCLR ८. ५० % तर दोन वर्षाचा MLCR ८. ६० % तर तीन वर्षाचा MLCR ८. ७० % आहे . स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने वर नमूद केलेले दर हे १५ मे २०२३ पर्यंत RBI ने नमूद केलेल्या नियमांनुसारच ठरवण्यात आले आहेत.

किती क्रेडिट स्कोरवर किती व्याजदर आकारला जाईल ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या संकेत स्थळावर ७५० व त्याहून अधिक स्कोर असलेल्यांना नियमित व्याज दर हा ९.१५ % इतका आकारला जाईल तर ७०० ते ७४९ इतका क्रेडिट स्कोर असलेल्यांसाठी ९. ३५ % इतका व्याजदर आकारण्यात येईल. ६५० ते ६९९ क्रेडिट स्कोर असलेल्यांना ९. ४५ % इतका व्याजदर आकारला जाईल.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)तर्फे हे सर्व नियम १ मे २०२३ पासून लागू होतील. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्राईम लेन्डिंग रेट हे १४. १५ % वरून थेट १४. ८५ % इतका म्हणजेच ० . ७०% नी वाढवला असून बेस रेट वाढवून ९. ४० % पासून वाढवून १०. १०% इतका केला आहे.