यंदाही दहीहंडीवर कोरोनाचे सावट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. सध्या कोणाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

सोमवारी जिल्हानिहाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. कोरोना महामारी च्या तिसर्‍या लाटेत जास्त रुग्ण संख्या वाढू शकते त्यामुळे वेळ आणि ऑक्सिजनची उपलब्धतेचा आढावा यावेळी सरकार कडून घेण्यात आला. दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेल्या त्रुटीचा विचार करून गेल्या वेळच्या तुलनेत आरोग्य सेवेमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर या वर्षी दहीहंडी उत्सवास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. दहीहंडी उत्सवात गर्दी जास्त प्रमाणात होते शरीर संपर्कही येतो. त्यामुळे दहीहंडी उत्सव जिल्ह्यात कुठे साजरा होणार नसून शहरातील काही उत्सव तर रद्द झालेले आहेत उर्वरित उत्सवांना आता परवानगी मिळण्याचा मुद्दा नसून शासनाने तज्ञाकडून सर्व माहिती घेतल्यानंतर यंदाच्या उत्सवावर बंदी आणण्याचे जिल्‍हाधिकारी चव्‍हाण यांनी सांगितले.

कोरोना ची तिसरी लाट ऑक्टोंबर महिन्यात येईल याला ते 4 लाख रुग्ण आढळतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. ग्रामीण भागात सुद्धा कोरोना संसर्ग बाबत लागू असलेले नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment