यंदाच्या गणेश चतुर्थीत जुळून आला 300 वर्षांचा योग; ‘या’ मुहूर्तातच करा गणेशाची स्थापना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यावर्षीची गणेश चतुर्थी तब्बल तीनशे वर्षानंतर एक विलक्षण योगायोग जोडून आली आहे. यंदा अंगारक योगात देखील चतुर्थी आल्यामुळे तिला खास महत्त्व आहे. यावर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेशाच्या स्थापनेचा योग आला आहे. याकाळात ब्रह्म योग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहेत. या अशा अनेक कारणांमुळे यावर्षीच्या गणेश चतुर्थीला विशेष स्थान लाभले आहे. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून गणेश उत्सव साजरी करण्यास सुरुवात होते. हा उत्सव तब्बल दहा दिवस चालतो. याकाळात गणेशभक्त या उत्सवाचा आनंद लुटताना दिसतात.

गणेश उत्सवाला खरी सुरुवात ही गणेश चतुर्थी पासूनच केली जाते. पुढील दहा दिवसात मग गणरायाची पूजा-आर्चा त्याची उपासना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा निरोप घेतला जातो. गणेशभक्तांसाठी हा क्षण सर्वात भावूक करतो. मुख्य म्हणजे, यावर्षीच्या गणेश चतुर्थीत तर, तब्बल 300 वर्षांनंतरचा विलक्षण योग जुळून आला आहे. अंगारक योगात गणेश चतुर्थी आल्यामुळे तिला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तसेच यावर्षी गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे जर या काळात भक्तीभावाने गणेशाला पुजले गेले तर त्याचे फळ नक्कीच मिळेल.

गणेश चतुर्थीचे महत्व (Ganesh Chaturthi)

गणेशाला बुद्धीची देवता मानले जाते. तसेच कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणरायाच्या नावाने ते सुरू केले जाते. गणेशाचा जन्म देखील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला स्वाती नक्षत्रात आणि सिंह राशीत झाला होता. त्यामुळे या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. तुम्ही जर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करणारा असाल तर ती दुपारच्या शुभ मुहूर्तावर करावी.

गणेश स्थापनेचा मुहूर्त

यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी आली आहे. परंतु पंचांगानुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होणार आहे. तसेच, 19 सप्टेंबर रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होणार आहे. या काळात गणेशाची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे.

गणेश विसर्जन मुहूर्त

गणेश चतुर्थी उत्सव हा तब्बल दहा दिवस साजरी केला जातो. यानंतर दहाव्या दिवशी गणेशाचा निरोप घेतला जातो. यावर्षी 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेशाचे विसर्जन करण्यात येईल. म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणेशाच्या विसर्जनाचा मुहूर्त असेल.