Nobel Peace Prize : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर!! अजूनही आहेत तुरुंगात कैद

narges mohammadi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) इराणच्या कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी (narges mohammadi) यांना जाहीर करण्यात आला आहे. इराणमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात लढा उठवल्यामुळे आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल यंदाचा शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात येत आहे. एक पुरस्कार आणि 8.33 कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सध्या नर्गिस मोहम्मदी या तेहरानमधील इविन या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

मानवाधिकारांसाठी आणि महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना सरकारकडून अटक करण्यात आली आहे. 51 वर्षाच्या नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला होता. यानंतर, त्यांना इराण सरकारविरोधात प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. नर्गिस या “डिफेंडर ऑफ ह्यूमन राईट सेंटर” संस्थेच्या उपप्रमुख आहेत. गेल्या 30 वर्षांपासून नर्गिस मोहम्मदी परखड लेखन करून इराण सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. यामुळेच त्यांना पाचवेळा दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच नर्गिस यांना यापूर्वी 13 वेळा अटक करण्यात आली आहे. मात्र तरी देखील त्या आपल्या भूमिकांवर ठाम राहून महिलांच्या हक्कासाठी लढत आहेत.

नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळतो? Nobel Peace Prize

(Nobel Peace Prize) नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी लढत आहेत. जे व्यक्ती सामाजिक प्रश्नांना घेऊन प्रचार करत असताना शांततेची शिकवण जगाला देतात अशा व्यक्तींना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात येतो. त्यामुळेच यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात येत आहे. त्यांनी महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा उठवत मानवाधिकारांसाठी काम केले आहे.