कोविड-19 मधून बरे झालेल्यांना लाईफ इन्शुरन्ससाठी 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोविड-19 चे बळी ठरलेली लोकं या आजारातून बरे झाले असतील, मात्र अडचणींनी त्यांची साथ अजूनही सोडलेली नाही. आता ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. इन्शुरन्स कंपन्या आता कोरोनामुळे बाधित लोकांचा इन्शुरन्स उतरवण्यास नाखूष आहेत. लाईफ इन्शुरन्स कंपन्या कोविडमधून बरे झालेल्या लोकांना इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी एक ते तीन महिन्यांचा वेटिंग पिरियड देत ​​आहेत.

संसर्गाची तीव्रता आणि हॉस्पिटलायझेशनची गरज यावर अवलंबून, इन्शुरन्स कंपन्या COVID-19 मधून बरे झालेल्या लोकांसाठी इन्शुरन्स पॉलिसीचे प्रस्ताव पुढे ढकलत आहेत. काही प्रकरणांमध्ये, सहा महिन्यांपर्यंत वेटिंग पिरियड दिला जात आहे. टर्म इन्शुरन्ससाठी वेटिंग पिरियड जास्त आहे. ज्यांना आधीच काही आजार आहेत आणि जे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत त्यांच्याकडून एक्स-रे सारख्या इतर वैद्यकीय चाचण्यांचीही कंपन्या मागणी करत आहेत.

कोरोनाच्या नंतरच्या परिणामांची भीती
बिझनेस टुडेच्या बातमीनुसार, पॉलिसीबाझार डॉट कॉमच्या टर्म लाइफ इन्शुरन्स हेड सज्जा परवीन म्हणतात की, भारत सध्या कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहे. गेल्या काही आठवड्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टचे आफ्टर इफेक्ट्स काय असतील हे सध्या कोणालाही माहीत नाही.

त्यामुळे, नुकतेच कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागते. टर्म इन्शुरन्समध्ये, एखाद्या व्यक्तीसाठी खूप कमी प्रीमियमवर मोठ्या रकमेचा इन्शुरन्स उतरवला जातो. तज्ञांचे म्हणणे आहे की, वेटिंग पिरियड कोविड-19 चे नंतरचे परिणाम जाणून घेण्यास मदत करते, जे नंतर पॉलिसी खरेदी करतानाच्या डिस्‍क्‍लोज फॉर्ममध्ये उघड केले जाऊ शकते.

कोविड संदर्भात फॉर्म भरणे आवश्यक आहे
टर्म प्लॅन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अनिवार्यपणे कोविड डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल. यामध्ये, इतर गोष्टींबरोबरच, गेल्या 90 दिवसांत त्यांना विषाणूची लागण झाली आहे की नाही हे देखील विचारले आहे. याशिवाय, संसर्गाच्या तीव्रतेवर आधारित चाचणीचे निकाल देखील मागवले जातात.

एक ते सहा महिने वेटिंग पिरियड
IndiaFirst Life Insurance मध्ये कोविडने बाधित लोकांसाठी 30 दिवस ते 6 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. Bhaskar.com मधील रिपोर्टनुसार, इंडियाफर्स्ट लाइफचे डेप्युटी सीईओ ऋषभ गांधी म्हणाले की,”जर एखादी व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये नसेल तर आमच्याकडे 30 दिवसांचा वेटिंग पिरियड आहे. मात्र जर तो होम क्वारंटाईनमध्ये असेल आणि त्याला आधीपासून काही आजार असतील तर वेटिंग पिरियड 60 दिवस असू शकतो. जास्त गंभीरपणे प्रभावित लोकांसाठी हा वेटिंग पिरियड सहा महिन्यांपर्यंत असू शकतो ज्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते.

Leave a Comment