सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यातील निसर्ग पर्यटन आणि धबधबे पाहण्यासाठी राज्यासह- परराज्यातील पर्यटक येत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे कडक लाॅकडाऊन असल्याने पर्यटकांना या विहंगमय दृश्ये पाहता येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विभागाने साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पर्यटकांना खुणावत असल्याचा विहंगमय व्हिडिअो सोशल मिडियावर प्रसिध्द केला आहे.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा काहीसा हिरमोड होत आहे. सातारा शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना स्वच्छंदीपणे मनमोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करण्याचे ठिकाण म्हणजेच “ठोसेघरचा धबधबा”. साधारण 350 मीटर उंचावरुन कोसळणारा पांढराशुभ्र ठोसेघरचा धबधबा आणि या कोसळणाऱ्या धबधब्यासोबत या ठिकाणचा निसर्ग नेहमीच पर्यटकांना खुणावत आला आहे. या ठिकाणी अंगाला झोंबणाऱ्या आल्हादायक वाऱ्याला मात्र यावर्षी पर्यटकांना मुकावं लागणार आहे.
Thoseghar Falls is a popular waterfalls located in Satara district.
It is one of the highest waterfalls in India and one of the best monsoon Tourist places in Maharashtra.
Have you ever witnessed the beauty of Thoseghar Falls?#MaharashtraMonsoon
Credit- shriprasad_9009 (IG) pic.twitter.com/05NIXpQOF6
— Maharashtra Tourism (@maha_tourism) June 11, 2021
दऱ्या कपारीतून वाट काढत तब्बल 1100 फूट खोल दरीत कोसळणारा ठोसेघरचा धबधबा यंदाच्या वर्षी कोरोनामुळे पर्यटकांविना कोसळत आहे. या धबधब्याने केवळ महाराष्ट्रच नाही, तर परदेशी पाहुण्यांनाही आपलेसे केले. अनेक परदेशी पाहुणे दरवर्षी येथे भेट देत असतात. कोरोनामुळे यंदा पर्यटकांना हे सर्व अनुभवायला मिळणार नाही.
गेल्या वर्षभरापासून दुसऱ्यांना लॉकडाऊन असल्यामुळे आणि प्रशासनाचे पर्यटनस्थळ बंद असल्याने सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांविनाच ओसाड पडलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. सरकारने पर्यटनस्थळे सुरु करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेले व्यवसाय सुरु होऊन कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा स्थानिक करत आहेत.