मनाला मोहित करणारा ठोसेघर धबधबा!! पावसाळ्यात नक्कीच भेट द्यावी असं पर्यटन स्थळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, उन्हाळाचा हंगाम संपत आला असून येत्या २ दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. उन्हाळयात आधीच वैतागलेल्या अनेकांना पावसाळ्याच्या दिवसात कुठेतरी बाहेर फिरायला जावं, आणि निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा आनंद घ्यावा असं वाटण साहजिकच आहे. तुम्ही सुद्धा अशाच देदीप्यमान निसर्गरम्य वातावरणात सहलीला जाण्याचा विचार करत असाल आज आम्ही तुम्हाला सातारा जिल्ह्यातील अशाच एका सुंदर ठिकाणाबाबत सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे ठोसेघर धबधबा… ठोसेघर धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. याठिकाणी नेमकं काय आहे? जायचं कस? याबाबत संपूर्ण माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया.

सातारा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या ठोसेघर या छोट्याशा गावाजवळ ठोसेघर धबधबा हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. ठोसेघर व चाळकेवाडी या २ गावांच्या सीमारेषेवर हा धबधबा असून तो दीड हजार फूट उंचीवरून कोसळतो. पावसाळ्यात या धबधब्यात जास्त पाणी असते आणि ते कोसळताना डोळ्याचे अगदी पारणं फिटत. त्यामुळे हा धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलं आहे. खासकरून पावसाळ्यात ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आसपास डोंगरदऱ्या, खडबडीत आणि निसर्गरम्य वातावरण आणि त्यातून पडणारे पाणी यामुळे ठोसेघर धबधबा खूपच प्रसिद्ध आहे.

Thoseghar Waterfall

ठोसेघर धबधब्याचे एकूण ३ मुख्य प्रवाह आहेत. याठिकाणी वेळात वेळ काढून आलेल्या पर्यटकांना व्यवस्थितरित्या धबधबा पाहता यावा म्हणून वनखात्याकडून २ निरीक्षक मनोरे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना अत्यंत सुरक्षितपणे हा धबधबा पाहता येतो. ठोसेघर धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी स्थानिक वन व्यवस्थापन समिती प्रति व्यक्ती ३० रुपये घेते. परंतु यामुळे तुम्ही निसर्गाचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकता आणि मनसोक्त आनंद घेऊ शकता.

thoseghar-falls-satara-1585641002

ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी जायचं कस?

ठोसेघर धबधबा याठिकाणी जाण्यासाठी साताऱ्यातून बसची सोय आहे. साताऱ्यातील राजवाडा येथून दर तासाला सातारा ते ठोसेघर बस तुम्हाला आरामात मिळू शकते. तर रेल्वेने जायचं झाल्यास माहुली हे जवळचे स्टेशन आहे. तसेच साताऱ्यातून मला खासगी गाड्या सुद्धा मिळू शकतात.