सोलापूर : धूम्रपान केल्याने कोरोना होतो असे सांगत स्नेहा वर्जाडी या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या याचिकेच्या विरोधात व राज्य सरकारकडून आपली बाजू मांडून घ्यावी या मागणीसाठी महिला विडी कामगारांनी बुधवारी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत आंदोलन केले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने विडी कामगार महिलांनी सहभाग घेतला आहे.
कोरोना होण्यास अनेक गोष्टी जबाबदार आहेत. त्यामध्ये आता धूम्रपान केल्यास कोरोना होतो, अशी याचिका स्नेहा वर्जाडी या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे विडी कामगार महिला आक्रमक झालेल्या आहेत. या आक्रमक झालेल्या महिलांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत प्रशासन आपली बाजू एकूण घेत नाही. आपल्या मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा पावित्रा या महिला कामगारांनी घेतला आहे.
धूम्रपान विरोधात वर्जाडी या महिलेने दाखल केलेल्या याचिकेनंतर राज्य सरकारकडून उद्या गुरुवारी याबाबत आपले म्हणणे सादर केले जाणार आहे. त्यामुळे आपलीही बाजू सरकारने ऐकून घ्यावी, या मागणीसाठी सोलापुरात आक्रमक झालेल्या महिला कामगारांनी आंदोलन केले आहे. आमच्या मागण्या मेनी करा, महिला कामगार संघटना एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा यावेळी आक्रमक झालेल्या महिला कामगारांकडून दिल्या जात आहेत.