Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना उडवण्याची धमकी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
284
threat call eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उडवण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 112 हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला असून मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असे बोलून सदर आरोपीने कॉल कट केला. पोलिसानी तात्काळ ऍक्शन मोडवर येत संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

राजेश आगवणे असे पोलिसानी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. राजेश आगवणे धारावीत राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सदर संशयिताला ज्यावेळी ताब्यात घेतलं त्यावेमी तो दारूच्या नशेत आढळला त्यामुळे या व्यक्तिने दारूच्या नशेतच धमकिचा कॉल केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पोलिस आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं आहे. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अशाच प्रकारे धमकी देण्यात आल्या होत्या. आता तर थेट मुख्यमंत्र्यांना धमकीचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे.