हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. करोना लसीच्या निर्मितीमुळे जगभरामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसी मिळण्याकरिता विनंती आणि मागणी करण्यात येत आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अदर पूनावाला यांनी मोठे विधान केले आहे. ‘द टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मी खरे बोललो तर माझे शीर कलम करण्यात येईल, अशी भीती मला वाटत आहे. देशातील मोठे- मोठे लोक मला सतत फोन करत आहेत. यामध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक मोठ्या व्यक्ती यांचा समावेश आहे’. या मोठ्या लोकांकडून सतत धमक्यांचे फोन कॉल येत असल्याचीही असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
यावर वरिष्ठ पत्रकार यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, ‘सिरम संस्थेचे अदर पूनावाला लंडनला गेले आहेत. तेथे गेल्यानंतर त्यांनी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांना धमक्या मिळत आहेत असे म्हटले आहे. ते आता भारताबाहेर औषध निर्मितीसाठी कारखाना उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील मोठी कंपनी आहे. या गोष्टीमुळे भारताची इमेज जगापुढे खराब होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यासोबतच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ‘देशाला सत्य समजण्याची गरज असल्याचे’ ट्विट करून म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा मिळाली होती. सीआरपीएफ काढून त्यांना देण्यासाठी एक तुकडीही तयार करण्यात आली होती. परंतु काही दिवसापूर्वीच अदर पूनावाला हे इंग्लंडला गेल्याची बातमी समोर आली व टाइम्समधून ही मुलाखत समोर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात याबाबत चर्चा आणि तर्कवितर्क केले जात आहेत. भारतातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी जर भारताबाहेर आपली निर्मिती शाखा बनवणार असेल तर, भारताच्या लसीकरण मोहिमेला खीळ बसण्याची चिंता होण्याची गंभीर शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.