हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी पैकी एक असलेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता आपली लस उत्पादक प्लांट भारताबाहेर हलवण्याचा विचारात असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी आधार पूनावाला हे लंडनला गेले आणि तिकडे त्यांनी द टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘देशातील मोठ्या लोकांकडून मला धमक्या मिळत आहेत व माझे शिर कलम केले जाईल अशी भीती मला वाटत आहे’. यावर अनेक दिग्गज लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वरिष्ठ पत्रकार रविष कुमार यांनीही याबाबत आपले मत सामाजिक माध्यमावर मांडले आहे.
याबाबत बोलताना रविष कुमार म्हणतात की, ‘सीरम संस्थेचे अदार पूनावाला लंडनमध्ये गेले आहेत. लंडनने आपली सीमा भारतीयांना बंद केली त्यापूर्वीच आदर पूनावाला तिथे पोहचले. टाईमला दिलेल्या मुलाखतीत ते असे म्हणत आहेत की जर मी सत्य सांगितले तर माझे डोके कापले जाईल. त्यांना धमक्या मिळत आहेत. आता ते भारताबाहेर औषध निर्मितीसाठी कारखाना उभारण्याचा विचार करत आहेत. सीरम ही जगातील एक मोठी कंपनी आहे. जर टाइम्समध्ये त्यांचे मुलाखत प्रकाशित होत असेल तर भारताबद्दल कोणती प्रतिमा बाहेरील देशांत तयार केली जाईल, याचा विचार करू शकता. फक्त एक प्रतिमा म्हणून विचार करू नका. तसेच या देशाला काय बनवलं गेलंय याचाही विचार करा’.
https://www.facebook.com/RavishKaPage/posts/305928734231380
काही दिवसांपूर्वीच आदर पूनावाला यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा मिळाली होती. मात्र, यानंतर आदर पूनावाला यांचे इंग्लंडला जाऊन मुलाखत देणे आणि लसीचे केंद्र भारतातून इतर देशांमध्ये हलवणे याबाबत उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत. यामुळे भारतीय लसीकरणावरती याचा मोठा परिणाम भविष्यात दिसून येण्याचे संकेत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही वेळापूर्वी महाराष्ट्रातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही, ‘सत्य समोर यावे’ असे ट्विट केले आहे.