तिघांना भावांना जन्मठेप : बोरखळ येथे शेतात शेळ्या गेल्याच्या रागातून एकाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | तालुक्यातील बोरखळ या ठिकाणी भरदिवसा 3 सख्ख्या भावांनी चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके याने एकाला मारहाण करत खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेतात चुकून शेळ्या गेल्याच्या रागातून झालेल्या वादावादीत ही घटना घडली होती. रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ तिघे (रा. बोरखळ) अशी आरोपींची नावे आहेत. राजेश नामदेव पाटील (वय- 40, रा.बोरखळ) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी मच्छिंद्र नारायण पाटील (वय- 48) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती.

तक्रारदार मच्छिंद्र पाटील हे 28 जून 2016 रोजी दुपारी 2.30 वाजता बोरखळ मधील कोळकीचा माथा या ठिकाणी शेळ्या चरत होते. त्यावेळी त्यांच्या शेळ्या संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात गेल्या होते. शेतात शेळ्या गेल्याच्या कारणातून पाटील रसाळ यांच्यामध्ये वाद झाला. आणि त्यातून पाटील यांना काठीने मारहाण झाली होती. या वादानंतर मच्छिंद्र पाटील घरी जात असताना त्यांचा पुतण्या राजेश पाटील यांना भेटला असता मारहाण झाल्याचे त्यांना समजले. यामुळे पाटील कुटुंबिय मारहाणीबाबतचा जाब विचारण्यासाठी रसाळ यांच्याकडे गेले होते. याचवेळी चौकात संशयितांनी हत्यारासह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात राजेश यांच्या पाठीवर, पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी तिन्ही भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तो दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले आहे

Leave a Comment