Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शरीरातील वाढणाऱ्या वजनाची फार चिंता लागून राहते. जस जसे वजन वाढू लागते तसतसे अनेक आजारही जवळ येऊ लागतात. मग वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय अवलंबतो. व्यायामापासून ते वजन घटवणारे पदार्थ, पेय आपण घेतो. तसेच शरीरातील वाढणाऱ्या चरबीला काही केल्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता असे काही जे उपाय आणि सवयी आहेत कि ज्या आपण लावून घेतल्या कि त्यातून आपण आपले वजन कमी करू शकतो. जाणून घेऊया मग त्या 3 सवयी…

वजन घटवण्यासाठी आरोग्य पौष्टिक आहाराचे सेवन करणे अतिशय आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांचा आहार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक मानला जातो. मात्र, त्याचबरोबर चांगल्या सवयीही तितक्याच महत्वाच्या असतात. अशा तीन सवयीबाबत पोषणतज्ञ अजरा खान यांनी त्याच्या इंट्राग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करत सातत्य आणि शिस्त ही गुरुकिल्ली दिली आहे.

https://www.instagram.com/reel/CdQcJHth_Ao/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओत खान यांनी वजन कमी राखण्याबाबतच्या तीन महत्वाच्या सवयीबद्दल सांगितले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, आजच्या धावपळीत ज्याचे वजन वाढलेले आहे त्यांचे वजन कमी करणे महत्वाचे आहे. मात्र, त्याहून जास्त महत्वाचे हे आहे कि कमी झालेले वजन जास्त न वाढू देणे होय. आणि कायमस्वरूपी जर वजन कमी करायचे असेल तर सर्वात प्रथम तीन सवयी स्वतःला लावून घ्याव्यात.

‘या’ आहेत त्या तीन सवयी –

Weight Loss Tips
1) शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय व्हा

आपल्याला जर आपले वजन लवकरात लवकर मी करायचे असेल तर आपण जास्तीत जास्त चालले पाहिजे. त्यासाठी दररोज सात ते आठ हजार पावले टाकले पाहिजे. ती आपण टाकत आहोत का? याची प्रत्येकाने खात्री करावी. तसे केल्यास आपन आकारात राहण्यास मदत होईल, असे खान यांनी सांगितले आहे.

2) कसरत करण्यासाठी कोणतीही भरपाई नाही

आपल्याला खरच जर आपले वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी दुसरी सवय लावून घायची ती म्हणजे खूप कसरत करण्याची होय. त्यासाठी स्वतःसाठी एक दिवसक्रम तयार करून घ्यावा. आणि शरीर व त्याचे आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी आठवड्यातून 4 दिवस खूप कसरत करावी.

Weight Loss Tips

3) निरोगी खाणे आणि जंक यांचे संतुलन ठेवा

आतापर्यंत उत्तम खाद्य पदार्थ खाल्यास चांगले आरोग्य राहते असे पोषणतज्ञ अजरा खान यांनी सांगितले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार 80 टक्के वेळ स्वच्छ खाणे आणि 20 टक्के तुम्हाला जे जंक वाटते ते खाल्ले तर आपण लवकर आपले वजन नियंत्रित करू शकू, या तिन्ही सवयी प्रत्येकाने अंगिकारल्या पाहिजेत, असे खान यांनी सांगितले आहे.

Weight Loss Tips

वजन कमी करण्यासाठी गरम पाणीही उपयुक्त

आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी गरम पाणीही उपयुक्त ठरते. दररोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाणी पिल्यास पचन क्रिया चांगली होते. दररोज सकाळी 2 कप कोमट पाणी पिल्यास शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने वजन झटपट कमी होते, असेही आयुर्वेदात सांगण्यात आलेले आहे.

Weight Loss Tips

प्रोसेस्ड फूडचे अधिक सेवन टाळा –

आपले वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोसेस्ड फूडचे अधिक प्रमाणात सेवन करणे होय. काहीजजणांना सवय असते कि सारखे दिवसभर प्रोसेस्ड फूड खाण्याची. मग ते बिस्कीट, स्नॅक्स, इस्टंट न्यूडल्स आदी दिवसभरात अधिक खात असतात. या पदार्थांमध्ये साखर, सोडियम आणि ट्रान्स फॅटसारखी तत्वे जास्त प्रमाणात असतात. जी वजन घटवण्यासाठी अडथळा ठरतात. यामुळे वजन वाढण्यास अधिक मदत होते.

हे पण वाचा – 

हार्ट अटॅक आला तर तात्काळ करा ही 5 कामे, वाचवू शकता रुग्णाचा जीव

Teeth Whitening : पिवळ्या दातांमुळे चारचौघात हसणंही झालंय मुश्किल? हे; घरगुती उपाय करुन पहाच

आता पॅकेट पाहिल्यावर समजेल तुमचे खाद्य किती Healthy आहे, सरकारने केली मोठी तयारी

नियमित व्यायाम केल्याचे आरोग्याला आहेत हे जबरदस्त फायदे

तुमचे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी या प्रकारचा हॉट व्यायाम करा

नियमितपणे व्यायाम करा आणि स्मरणशक्ती वाढवा

Leave a Comment