Monday, February 6, 2023

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या विविध जोरदार भागांमध्ये पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिकं देखील भुईसपाट झाली आहेत. आज कोल्हापुरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान कोल्हापुरात भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी इथं ही घटना घडली आहे. एका पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघेजण जागीच ठार झाले आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पावसापासून आडोसा घेण्यासाठी हे तिघे पोल्ट्रीच्या भिंतीजवळ थांबले होते. त्यानंतर अचानक भिंत कोसळली आणि ढीगऱ्याखाली अडकून तिघांचाही मृत्यू झाला.

- Advertisement -

आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान तळकोकणात ही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. त्यासोबतच बेळगावात की पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचा हा परिणाम आता दिसून येत आहे.