कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
काल दुपारी ऊसतोडणी सुरू असताना अढळलेली बिबट्याची तीन्ही पिल्ले अखेर तीच्या आईच्या ताब्यात देण्यात वनविभाला रात्री यश आले. पिल्लाना एका प्लास्टीक बकेटमध्ये ठवले होते. रात्री 9.30 ते 12 दरम्यान बिबट्या मादीने दोन पिल्लाना उचलले. तर पहाटे एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे.
येथील कानिफनाथ मंदिर परिसरात तानाजी नाना खबाले यांचे शेत आहे. काल ऊसतोडणी त्याठिकाणी सुरू होती. तोडणी अर्ध्यावर गेल्यानंतर एका सरीत तीन पिल्ले आचानक निदर्शनास आली. एका तोडणीमजूराने ती पाहिली. पिल्ले बीबट्याचीच असल्याने मजूरांत भिती निर्माण झाली. त्यानीच अन्य शेतकऱ्यांना घटनेची माहिती दिली. वनविभागाला पाचारण केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पिल्लाना ताब्यात घेतले. बीबट्या मादी व पिल्लाचे मिलन घडवून अणण्यासाठी वनविभागाने सापळा त्यानंतर रचला. सायंकाळी उशिरा त्या परिसात ट्रॅप लावला. तिन्ही पिल्ले प्लास्टीकच्या बकेटमध्ये त्यासाठी ठेवली. सीसी कॅमेरे लावले. रात्री 9.30 ते 12 च्या दरम्यान पिल्लाना मादीने ताब्यात घेतले. त्यानंतर पहाटे एका पिल्लाला तिने उचलले. नैसर्गिक अधिवासत पिल्लाना ती घेऊन गेली. कर्मचाऱ्यांनी त्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. सीसी कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे.
सातारा सहाय्यक वनसरंक्षक महेश झाजुर्णे, कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक उत्तम पाढंरे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, मानद वनजीवरक्षक रोहन भाटे, वनसमिती अध्यक्ष तानाजी खबाले, वनसेवक भरत पवार, अमोल माने, सोसायटी लिपीक शंकर खबाले यांनी बीबट्या मादी अणि पिल्लाचे मिलन घडवून अणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. तिन्ही पिल्ले दीड-दोन महिन्याची आहेत. तीन्ही पिल्ले माजी जातीची आहेत. असे वनविभागाने माहिती देताना सांगितले. त्या वस्ती परिसरातील ग्रामस्थांत बीबट्याची भिती मात्र कायम आहे. रात्री-अपरात्री ऊसाला पाणी द्यायला शेतकरी घाबरत आहेत. बंदोबस्ताची मागणी त्यांच्याकडून होत आहे.