वृत्तपत्राच्या बातमीदारावर ३ जणांचा चाकु हल्ला; मेळघाटातील धारणीमधील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्हाच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात गुरुवारी एका वृत्तपत्राच्या बातमीदारावर धारधार चाकूने ३ जणांनी सपासप वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेख मलिक शेख रहीम असे जखमी झालेल्या बातमीदाराने नाव आहे. शेख रहीम हे धारणी येथून बातम्या लिहिण्याचे काम करतात. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान शेख मलिक शेख रहीम हे धारणी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर काल ३ अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी हि घटना पाहताच सदर ठिकाणी धाव घेतली. मात्र हल्लेखोरांनी तातडीने तेथूनपळ काढला. नागरिकांनी तातडीने जखमी अवस्थेमध्ये शेख रहीम यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी आता त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना सीसीटीव्ही मध्ये हि घटना कैद झाल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही मध्ये एका दुचाकीवर तिघे हल्लेखोर दिसत आहेत. दरम्यान या हल्याचे कारणअद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा तपास धारणी पोलिस करत असुन लवकरच हल्यातील आरोपी गजाआड होतील असे पोलिसांचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रासह अमरावती जिल्हामधे कार्यरत असणाऱ्या ‘द पावर ऑफ मिडिया’ या संघटनेतर्फे या हल्याचा निषेध नोंदविला गेला असुन लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.