पोपळकरवाडी येथे भीषण अपघातात दुचाकीवरील 3 जण जागीच ठार

0
133
Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

निमसोड -म्हासुर्णे मार्गावर असलेल्या पोपळकरवाडी येथे एका ट्रीपल सीट निघालेल्या मोटरसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटर सायकलवरील तीघेजण जागीच ठार झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल रात्री शनिवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडली. या अपघातातील मृतांमध्ये गजानन दबडे (रा. कलेढोणे, ता. खटाव) यांचासह दोन राजस्थानी कामगाराचा समावेश आहे. अज्ञात वाहनाविरोधात मायणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन दबडे हे राजस्थानी कामगारांबरोबर निमसोडकडे जात होते. यावेळी एका आज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यात हे तिघेजण जागीच ठार झाले. यावेळी वाहनचालक वाहनासह पसार झाल्याने त्या वाहनाची माहिती समजू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच मायणी पोलिस घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला. यावेळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वडूजला नेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here