औरंगाबाद | काही दिवसांपासून सिल्लोडच्या दिवाणी न्यायालयात मोकळ्या प्लॉटच्या वादातुन तरुणाला मारहाण करून खून केल्याचे प्रकरण सुरु होते. आता या प्रकरणाचा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी लावला आहे.
एस. के. कुलकर्णी यांनी प्लॉटच्या वादातुन मारहाण आणि खून केल्या प्रकरणी जन्मठेप आणि प्रत्येकाला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा त्याचबरोबर चौथ्या आरोपीला सक्त मजुरी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा थोठावली आहे. शेख मोहम्मद अहेमद (वय 45), शेख मोहम्मद इसाक (वय 48), ही जन्मठेप ठोठावलेल्या आरोपीची नावे आहेत.
या प्रकरणाच्या सुनावणी वेळी विशेष सहाय्यक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी नऊ साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैशाली आणि फिर्यादी त्याचबरोबर वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला आहे. या सुनावणीच्या अंतिम सत्रात न्यायालयाने वरील तिन्ही आरोपीना कलम 324 अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी अॅड शरद बांगर यांना ऍड रमेश ढाकणे यांनी मदत केली आहे.