सातारा | पुणे- बंगळूर महामार्गालगत खोडद (ता. सातारा) येथे असलेल्या संत निरंकारी मंडळाचे शेडमधून 36 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. केवळ 24 तासांत बोरगाव दिवसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. तर या संशयितांकडून पोलिसांनी 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात निकेत पाटणकर (वय-29) व अनिकेत पाटणकर (वय- 30, दोघेही रा. नवीन एमआयडीसी, चंदननगर, कोडोली, सातारा) व गणेश ननावरे (वय- 24, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद महेश सर्जेराव माने (वय- 32, रा. काशीळ, ता. सातारा) यांनी दिली होती.
खोडद येथे संत निरंकारी मंडळ आहे. तेथे पत्र्याचे शेड बांधण्यात आले आहे. या शेडमधून अनोळखी चोरट्यांनी शेडच्या पत्र्याची पाने उचकटून पीव्हीसी पाइप, लोखंडी पाइप, प्लॅस्टिक टेबल लोखंडी सळ्या, प्लॅस्टिक खुर्च्या, पत्र्याची पाने असा सुमारे 36 हजार रुपये किमतीचा पळविला. मंगळवारी सकाळी ही चोरी झाली होती.
सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण शिंदे, राजू शिखरे, विजय साळुंखे, विशाल जाधव, दादा स्वामी, प्रशांत मोरे, राहुल भोये व धनंजय जाधव यांच्या पथकाने सापळा रचून टाटा कंपनीचा टेंपो साहित्यासह पकडला. खोडद चोरी तरी 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, तीन मोबाईल व टाटा टेम्पो असा सुमारे सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.