महिला हाॅकीत थरार : भारताचे कांस्यपदकाचे स्वप्न अधुरे, ब्रिटनचा 4-3 ने विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टोकोयो |  तीनवेळा ऑलिम्पिक विजेत्या ब्रिटनसोबत भारताच्या महिला संघाचा सामना झाला. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघ ग्रेट ब्रिटनशी जोरदार भिडला. पहिल्यांदाच महिला हॉकी संघाजवळ पदक मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. कांस्य पदकाच्या या सामन्यात भारत-ब्रिटनमध्ये ‘थरार’ पाहायला मिळाला, मात्र शेवटच्या काही वेळात ब्रिटनने केलेल्या दोन गोलमुळे 4-3 असा सामना भारताने गमावला.

ब्रिटनने 2 ऱ्या आणि 10 व्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी काॅर्नर मिळाले होते, मात्र भारतीय महिलांनी अतियश चांगला खेळ करत गोल करू दिला नाही. पहिला क्वार्टरमध्ये 15 मिनटाच्या खेळात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. ब्रिटेनला पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन संधी मिळाल्या पण भारतची गोलकीपर सविता पुनियाने दोन्ही वेळी शानदार बचाव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटेनचा संघाचा खेळ वरचढ ठरलेला होता.

ब्रिटनने दूसऱ्या क्वार्टरची शानदार सुरुवात केली आहे. सामन्याच्या 16 व्या मिनटाला ब्रिटनने पहिला गोल केला. इली रायरने फील्ड गोल केला. त्यामुळे भारत 0-1 ने सध्या पिछाडीवर आहे. ब्रिटनने 24 व्या मिनिटांला दूसरा गोल रिवर्स शॉटद्वारे साराह रोबोस्टनने केला. या गोलमुळे ब्रिटेन 2-0 ने सामन्यात आघाडीवर होते. गुरजीत कौरने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं आहे. तिने दोन शानदार गोल केले आहेत. गुरजीतने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. गुरजीतने 2 मिनिटांच्या आतमध्ये हे दोन्ही गोल केले. तिने पहिला गोल 25 व्या मिनिटाला केला तर दूसरा गोल 26 व्या मिनिटाला केला. या गोलबरोबरच भारताने ब्रिटेनशी 2-2 अशी बरोबरी केली.

पहिल्या क्वार्टरनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा शानदार खेळ केलेला पाहायला मिळाला. पहिल्यांदा गुरजीत कौरने 3 मिनिटांत 2 करुन भारताचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. लगोलग भारताने आणखी एक गोल करत 3-2 ने आघाडी मिळविली होती.

तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात करत ब्रिटनकडून तिसरा गोल केला गेला. ब्रिटनच्या वेबने 35 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करण्याची संधी दिली. यानंतर भारतला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आलं. त्यामुळे 35 व्या मिनिटांला भारत- ब्रिटन या दोन्ही संघाचा स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. परंतु काही वेळातच चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ब्रिटनने चौथा गोल केला. ब्रिटन 4-3 ने विजय मिळवला. मात्र कांस्य पदकाच्या सामन्यात भारत-ब्रिटनमध्ये ‘थरार’ पाहायला मिळाला.