थरारक : अतिप्रसंगचा प्रयत्न फसल्यानंतर धावत्या रेल्वेतून अल्पवयीन मुलीला फेकून दिले, आरोपी सैन्य दलातील

ट्रेन ब्लाक करत अवघ्या 10 तासांत सैन्य दलातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गोवा- निजामुद्दीन ही रेल्वेगाडी गोव्यावरून सुटल्यानंतर रात्री दीड वाजता सातारा येथे तेथून पुढे लोणंदला पोहचण्यास अर्धा तास लागतो. या वेळेत एका सैन्य दलातील फौजीने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसल्याने तिला धावत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची घटना घडली. सातारा जिल्ह्यातील सातारा- लोणंद या दरम्यान आदर्की फाटा येथे ट्रेन आल्यानंतर आरोपीने मुलीला बाहेर फेकून दिले. परंतु ट्रेन ब्लाक करत अवघ्या 10 तासांत सैन्य दलातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, गोवा- निजामुद्दीन ही रेल्वेगाडीतील एस 7 हा डबा आहे, त्याच्यामध्ये 25,26,27,28 मध्ये एक कुटुंब दिल्लीला जाण्यासाठी प्रवास करत होते. त्या कुटुंबातील कर्ता पुरूष मिलिट्रीतून रिटायर झाल्याने ते दिल्लीला निघाले होते. रात्री जेवण झाल्यानंतर मुलगी बेडवर झोपलेली होती, तेव्हा आरोपीने त्या मुलीला बाथरूमध्ये झोपेतच नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता मुलीला जाग आली. त्या मुलीला जाग आल्यानंतर ती रडू लागली आणि लाथा मारू लागली. तेव्हा आरोपीने तू रडू नको तुझ्या आईकडे सोडतो म्हणाला अन्‌ मुलीला दरवाजा उघडून बाहेर फेकून दिले. सुदैवाने आदर्की फाटा झाल्यानंतर घाट रस्ता असल्याने रेल्वचे स्पीड 20 चे होते. मुलीला बाहेर फेकले असले, तरी तिला कमी प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. तेथील स्थानिकांना मुलगी गावातील किंवा परिसरातील असे वाटले. नंतर तिला हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी आणले असताना तिने घडलेली खरी हकीकत सांगितली.

ट्रेन ब्लॉक करून आरोपी ताब्यात

पोलिसांना ही बातमी समजताच महाराष्ट्र राज्य लोहमार्गच्या अप्पर महासंचालक प्रज्ञा सरोदे यांनी माहिती दिली. तेव्हा त्यांनी ट्रेन ब्लाक करायची सूचना दिली. ट्रेन ब्लॉक केल्यानंतर एकाही प्रवाशाला खाली उतरू दिले नाही. लोणंद – जळगाव या दरम्यान 300 ते 400 कॉन्सटेबल आणि मित्र प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बसविले. रेल्वेतील कोणलाही खाली उतरू दिले नाही. यावेळी जवळपास 20 ते 30 लोकांची ओळखपरेड केली. त्यातून मुलीने आरोपीला ओळखले आहे. तेव्हा त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी मिलिट्रीतील असून झांशीच्या युनिटमध्ये कार्यरत आहे.

पिडित मुलगी 8 वर्षाची अल्पवयीन आहे. तिच्या हनुवटीला खरचटले असून पायाला फॅक्चर आहे. तसेच तिला अजून काही उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेणे गरजेचे असल्यास तिला नेले जाणार असल्याची माहीती लोहमार्ग अधीक्षक पुणे सदानंद वायसे पाटील यांनी दिली.