Thyroid | आजकाल थायरॉईडची समस्या अनेक लोकांना झालेली आहे. थायरॉईड आपल्या घशात असणारी एक लहान ग्रंथी आहे. यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया नीट होत असते. जेव्हा हे थायरॉईड योग्यरीत्या काम करत नाही. त्यावेळी आपल्याला आरोग्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हे थायरॉईड नक्की कशामुळे होते? याची कारण काय आहे? तसेच थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी कोणत्या सवयींचा अवलंब केला पाहिजे? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
थायरॉइड होण्याची कारणे | Thyroid
थायरॉईड ही अत्यंत सामान्य समस्या आहे. अनेक कारणांमुळे अनेक लोकांनाही समस्या उद्भवते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हार्मोनल इनबॅलन्स झाले, तरी थायरॉईडचा प्रॉब्लेम निर्माण होतो. ज्यावेळी थायरॉईड ग्रंथी पुरेशी संप्रेरके तयार करत नाही. किंवा खूप जास्त तयार करत नाही. त्यावेळी यासारख्या समस्या निर्माण होतात. आयोडीनची कमतरता असल्याने देखील थायरॉईडची समस्या निर्माण होते. कारण थायरॉईड तयार करण्यासाठी आयोडीन खूप महत्त्वाचे असते.
आनुवंशिकतेमुळे देखील थायरॉईडची (Thyroid) समस्या निर्माण होते. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला थायरॉईडची समस्या असेल, तर तीच समस्या इतर लोकांना होण्याची देखील शक्यता असते. तसेच जर तुम्ही जास्त ताण घेतला त्याचप्रमाणे तुमची जीवनशैली खराब असेल, तरी देखील थायरॉईडच्या समस्येला तुम्ही सामोरे जावे लागते. आता आपण जाणून घेऊयात की, थायरॉईड पासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत?
खाण्याच्या सवयी | Thyroid
तुम्ही तुमचा आहार नीट घेतला पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या असल्या पाहिजेत. तसेच फळे, पालक, कोबी यांसारख्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने देखील थायरॉईडचे संतुलन राहते. तसेच तुम्ही ओट्स, तांदूळ, ज्वारी यासारखे संपूर्ण धान्य खाल्ले पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला थायरॉईड होणार नाही. तसेच थायरॉईडसाठी आयोडीन आवश्यक असते. त्यामुळे मीठयुक्त पदार्थ खाणे देखील गरजेचे आहे.
नियमित व्यायाम करणे
थायरॉईड पासून बचाव करण्यासाठी नियमित योग आणि प्राणायाम करणे खूप गरजेचे असते. यासाठी दररोज वीस मिनिट तरी व्यायाम करा. तसेच रोज सकाळी की आणि संध्याकाळी चालायला जा. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि तुमची चयापचय आहे प्रक्रिया सुधारते.
औषधांचा वापर
तुम्हाला जर थायरॉईड झाला किंवा इतर कोणताही आजार झाला तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या. आणि योग्य ते पालन करा. तसेच डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे आणि योग्य डोस घेणे.
ताणतणाव कमी घेणे
आजकाल लोकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासाठी दररोज ध्यान आणि योगा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे मानसिक शांती मिळते. आणि तणाव कमी होतो आणि मन शांत असले की, थायरॉइड ग्रंथी देखील निरोगी राहतात.
पुरेशी झोप घ्या
दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे खूप गरजेचे असते. या झोपेमुळे शरीरात तंदुरुस्त राहते. आणि थायरॉईड ग्रंथी देखील निरोगी राहतात. तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याची वेळ एकच ठेवा. यामुळे बॉडी क्लॉक काम करते.
भरपूर पाणी प्या
तुमच्या शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेशी पाणी पिणे खूप गरजेचे असते. तसेच जर तुम्ही कोमट पाणी पिले तर थायरॉईड ग्रंथांना आराम मिळतो. आणि तुमची चयापचय प्रक्रिया देखील सुधारते त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या