‘ती फुलराणी’ साजरा करतेय ४२ वा वाढदिवस; हॅपी बर्थडे अमृता सुभाष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष अर्थातच लोक जिला फुलराणीच्या नावाने ओळखतात तिचा आज वाढदिवस आहे. प्रेक्षकांची लाडकी फुलराणी आज ४२ वर्षांची झाली आहे. अमृताचा वाढदिवस १३ मे १९७९ साली झाला. लहानपणीच तिला आई ज्योती सुभाष यांच्याकडून अभिनयाचे बाळकडू मिळाले. अमृताने फक्त मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपली विशेष छाप उमटविली आहे. मात्र लोकांच्या लक्षात राहिलेली आणि मनाला भावलेली तिने साकारलेली नाट्यगृहातील ‘ती फुलराणी’ अजरामर झाली. अमृता एका उत्तम अभिनेत्रीशिवाय एक लेखिका, गायिका आणि संगीतकारदेखील आहे.

https://www.instagram.com/p/COzdFSBq93r/?utm_source=ig_web_copy_link

अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. दिल्लीतील एनएसडीत अमृताने सत्यदेव दुबेंकडून अभिनयातील बारकावे बारकाईने शिकले. तिथे रंगभूमीवर हिंदी तसेच जर्मन भाषिक नाटकांमध्ये काम केले. महाराष्ट्रात परतल्यानंतर तिला मराठी रंगभूमीवर ‘ती फुलराणी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि लोकांच्या मनावर राज्य केले ते फुलराणीनेच.

https://www.instagram.com/p/BoJR2dIhMHJ/?utm_source=ig_web_copy_link

या नाटकातील अमृताच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. ही भूमिका अमृतापूर्वी भक्ती बर्वे यांनी साकारली होती. अमृता सुभाषचे लग्न अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णीसोबत झाले आहे. या नात्याने सोनाली अमृताची नणंद आहे.संदेश आणि अमृताचे लव्ह मॅरेज आहे. अमृताचा नवरा संदेश स्वत:देखील एक उत्तम लेखक, अभिनेता आणि इंजिनिअरही आहे.

https://www.instagram.com/p/COqP9kpB5ot/?utm_source=ig_web_copy_link

अमृताने २००४ साली ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. श्वास सिनेमाला ५१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. शिवाय ऑस्करमध्येही या सिनेमाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अवघाची संसार या मालिकेतील भूमिकेतून अमृता घराघरात पोहचली.अमृता उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तिने तीन वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले आहे. ‘जाता जाता पावसाने’ हा तिचा अल्बमदेखील प्रकाशित झाला आहे. याशिवाय हापूस, अजिंठा या चित्रपटांसाठी अमृताने पार्श्वगायन केले आहे. इतकेच नव्हे तर अमृता एक संगीतकारसुद्धा आहे. नितळ आणि तीन बहने या चित्रपटांसाठी तिने संगीत दिले आहे.

https://www.instagram.com/p/CL4cYTGBoaL/?utm_source=ig_web_copy_link

अमृताने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही उत्तम दर्जाचे काम केले आहे. रमन राघव २.० या सिनेमात अमृता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रुपेरी पडद्यावर झळकली होती. याशिवाय ती गली बॉय सिनेमातही झळकली आहे.अमृताने तिची आई ज्योती सुभाष यांच्यासोबत आजी, झोका, गंध, मसाला, नितळ, वळू, विहिर या दर्जेदार चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिकांमध्ये काम केले आहे. २००९ मध्ये आलेल्या गंध या चित्रपटात या दोघी आई-मुलीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. तर आजी या सिनेमात ज्योती सुभाष यांनी अमृताच्या आजीची भूमिका वठवली होती.

Leave a Comment