‘टिकटॉक’ने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत; दिले ‘इतके’ कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । तरुणांमध्ये नव्हे तर थोरा-मोठ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले व्हिडिओ शेअरिंग ऍप ‘टिकटॉक’ने कोरोनाच्या लढाईत सामाजिक भान राखत आपलं लाखमोलाचं योगदान दिल आहे. या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा देखील केला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिकटॉक कंपनीचे आभार सुद्धा मानले आहेत.

याचबरोबर टिकटॉक ऍपच्या माध्यमातून कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याचे कंपनीने मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. “महाराष्ट्रात आणि मुंबईत टिकटॉकसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारावर आहे. त्यामुळेच या राज्याप्रती असलेल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेची आम्हाला जाणीव असल्याचे टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी या पत्रात म्हटलं.

तसेच राज्याच्या पोलीस दलासाठी एक लाख मास्क उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी पत्रात सांगितले. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी अधिकाधिक मदत गोळा व्हावा यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”