Tirupati Sainagar Shirdi Express या साप्ताहिक विशेष गाडीची मुदत वाढवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tirupati Sainagar Shirdi Express | भारतातील अनेक लोक धार्मिक स्थळांना भेट देतात. त्यामुळे अश्या स्थळांसाठी रेल्वे नेहमीच तत्पर असते. अश्या ठिकाणी प्रवाश्यांना घेऊन जाण्यासाठी भारतीय विविध पॅकेजही तयार करतात आणि त्याद्वारे प्रवासी आपल्या धार्मिक स्थळांना भेट देतात. याच सर्व पार्श्वभूमीवर तिरुपती- साईनगर शिर्डी ही विशेष साप्ताहिक गाडी प्रवाश्यांसाठी सुरु करण्यात आली होती. ज्याला प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता या गाडीची मुदत वाढवण्यात आली आहे. आता इथून पुढे ही गाडी रुळावर कधी पर्यंत धावेल याबाबत जाणून घेऊयात.

28 जानेवारी पर्यंत चालेल ही गाडी- Tirupati Sainagar Shirdi Express

तिरुपती – साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी (Tirupati Sainagar Shirdi Express) ही प्रवाश्यांसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत चालवली जाणार होती. मात्र आता या गाडीला प्रवाश्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे या गाडीची मुदत आता वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे ही गाडी आता 28 जानेवारी 2024 पर्यंत रुळावर धावणार आहे. ज्यामुळे प्रवाश्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी 27 नोव्हेंबर पर्यंत धावणार होती. आता ती 29 जानेवारी 2024 पर्यंत रुळावर धावणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांनाही याचा दिलासा मिळाला आहे.

कशी आहे ही गाडी?

या स्पेशल चालवल्या जाणाऱ्या गाडीची रचना ही इतर गाड्याप्रमाणेच आहे. मात्र या गाडीला एकूण 21 कोच म्हणजेच डब्बे आहेत. ज्यामध्ये एक एसी 2 टीयर असून 2 एसी 3 टीयर आहेत. तर 14 स्लीपर क्लास डब्बे आहेत. 2 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 गार्ड ब्रेक वैन अशी गाडीची रचना आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होतो. या विशेष रेल्वे गाडीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही रेल्वे प्रशासनकडून करण्यात आले आहे.