अहमदनगर प्रतीनिधी । नगर शहर मतदारसंघातील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारार्थ दिल्ली येथील जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि भाकपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कन्हैय्या कुमार यांची गुरुवारी नगरमध्ये सभा पार पडली. नगर शहर मतदारसंघातून भाकप कडून बहिरनाथ वाकळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता वाकळे यांच्या प्रचारार्थ कन्हैय्या कुमार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कन्हैया कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी कन्हैया कुमार म्हणाले कि, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे हा भगतसिंगचा अपमान आहे. सावरकरांना आम्ही मानत नाही. मानहानीचा दावा केला तरी चालेल, सावरकरांना पुरस्कार देणे हा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे. बेरोजगारी, बेकारी, तरुणांना नोकरी नाही यावर प्रश्न विचारू नये म्हणून केलेला हा चुनवी जुमला आहे असही ते म्हणाले. राम राम म्हणून नथुरामचं राज्य सत्ताधारी घेऊन आले आहेत. इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही टीका भाजप वर केली आहे.