Sunday, May 28, 2023

महाबळेश्वच्या आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक प्रशासनाच्या मदतीला

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर झाल्याने १८ जागी रस्ता खचला असुन ९ ठिकाणी दरड कोसळली आहे. कांदाटी खोऱ्याचा संपर्कही तुटला असुन रस्ता खचल्याने दळणवळनाचा प्रश्न बिकट झाला आहे. मात्र, अशा बिकट परस्थितीतही शिवसैनिक मात्र तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्या करीता शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करत असतानाचे बोलके चित्र महाबळेश्वर तालुक्यातील आपात्कालीन परस्थितीत दिसत आहे.

महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला असल्यामुळे माघरमार्गे तापोळा रस्ता खुला करण्याकरीता शिवसैनिक स्व: ता प्रयत्न करत आहेत. महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तालुक्यातील वाघोरी-सातारा रस्ता, तापोळा-महाबळेश्वर रस्ता, तापोळा-वानवली ते आटेगाव रस्ता, पाली ते वेळापुर रस्ता, कोट्रुशी ते तापोळा, माचुतर रस्ता, शासकीय विश्रामगृह, गोरांबे येथील रस्ता, शिवकालीन खेडे येथे रस्ता, घोणसपुर रस्ता, रुळे ते गावडोशी रस्ता, आहीर ते आवळण रस्ता खचला असल्याची नोंद महाबळेश्वर प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील ९ जागी दरड कोसळली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील प्रामुख्याने धावरी येथे डोंगर खचला आहे. बिरवाडी, कासरुड, चतुरबेट, गोरुशी येथे दरड कोसळली असून चतुरबेट येथे वाहतुकीचा पुल वाहुन गेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील २३ घरांचे नुकसान अति पावसाने झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भात व नाचणी पिकाचे नुकसान झाले आहे. तर भिलार परिसरातील बटाटा पिकाचे झाले आहेत.