वृत्तसंथा । सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्यासाठी WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकाचवेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे.
सतत फॉरवर्ड होणाऱ्या फेक मेसेजेसला रोखण्यासाठी WhatsApp कंपनीने ही नवीन मर्यादा घातली आहे. यानुसार, एखादा मेसेज तुम्ही एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करु शकाल, पण त्यानंतर मात्र जर तोच मेसेज तुम्हाला पुन्हा फॉरवर्ड करायचा असेल तर तुम्ही केवळ एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करु शकणार आहात. पुढील अपडेटपासून मेसेज फॉरवर्डची ही नवी मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे.
WhatsApp’s new limit on frequently forwarded messages aimed at combating spread of fake news, misinformation amid COVID-19 pandemic
— Press Trust of India (@PTI_News) April 7, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा
करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी
मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर