Sunday, June 4, 2023

आज PM किसानच्या 10 व्या हप्त्याचे पैसे मिळणार, लवकर करा ‘हे’ काम नाहीतर पैसे अडकतील

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार नवीन वर्षात देशातील शेतकऱ्यांना एक भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12:30 वाजता पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना ट्रान्सफर करतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक थेट (DBT) ट्रान्सफर केले आहेत.

पैसे मिळतील की नाही ते पहा
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

याप्रमाणे लिस्टमध्ये तुमचे नाव तपासा
1. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. Farmers Corner सेगमेंटमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्ट मधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर Beneficiaries List दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

‘या’ शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत
ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.

हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
तुमचे सर्व तपशील बरोबर असतील आणि त्यानंतरही तुमचे नाव लिस्टमध्ये समाविष्ट नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावर कॉन्टॅक्ट करून तुमचे नाव जोडू शकता. यासाठी 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. इथे तुमची समस्या दूर होईल.