औरंगाबाद : सरल प्रणाली मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याच्या प्रक्रियेत औरंगाबाद जिल्हा पिछाडीवर आहे. अपडेटचे केवळ 50 टक्के काम पूर्ण आहे. त्यानंतरही 27 मे पर्यंत केवळ 62.63 टक्के काम पूर्ण झाले. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने नाराजी व्यक्त करत 30 मे पर्यंत आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विलंब होणार या प्रक्रियेला सर्वस्वी प्रशासन अधिकारी अथवा शिक्षणाधिकारी जबाबदार राहणार असल्याचे कळवले आहे.
11 ते 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ 50 पॉईंट ते 40 टक्के माहिती भरण्यात आली होती. आधार नोंदणी अद्ययावतीकरणात औरंगाबाद जिल्हा 35 म्हणजे शेवटच्या क्रमांकावर आहे. माहिती भरण्यासाठी 20 मेपर्यंत मुदत असताना केवळ पन्नास टक्केच नोंदणी झाल्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेऊन नोंदणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 27 मेपर्यंत सर्व तालुक्यांनी मिळून 21.50 टक्के काम पूर्ण केले. तर महापालिका क्षेत्रात फक्त 3.99 टक्के काम झाल्याचे दिसून आले. याबाबत शिक्षण संचालनालयाने नाराजगी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात 30 मे पर्यंत आधारकार्ड अपडेट करण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तसेच विलंब होणार या प्रक्रियेला सर्वस्वी प्रशासन अधिकारी अथवा शिक्षणाधिकारी जबाबदार राहणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने पत्रात म्हटले आहे.