संजय राऊत अगदी पगारी नोकरासारखं वागतायत ; भातखळकरांनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप कडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजप आमदार अतुल भातखलळतर यांनी राऊतांवर निशाणा साधत संजय राऊत हे अगदी पगारी नोकरासारखं वागतायत अशा शब्दांत टोला लगावला.

संजय राउताना अलीकडे नेहरुंच्या नावाने खूपच उचक्या लागतात. ते अगदी पगारी नोकरासारखं वागतायत. शिवसेनाप्रमुखांच्या काळात असं काही म्हणण्याचे धाडस झाल असतं? नव्या मालकांनी इटालियन मातोश्रींचे गळाबंधन बांधलेले आहे. त्यामुळे रोज राहुलजींचे बुटपोलिश सुरु असते अस ट्विट अतुल भातखळकर यांनी केले.

तर बाळासाहेबांनी राऊतांच्या थोबाडीत मारली असती- चंद्रकांतदादा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला. नेहरू आणि गांधी यांच्याबाबत राऊत यांचे मत बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले तर ते स्वर्गातून त्यांच्या थोबाडीत मारतील, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते –

काँग्रेसच्याच पुण्याईवर आपला देश अजून चालत असून मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार वर घणाघाती टीका केली. तसेच मोदी सरकारच्या काळात नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही त्यानी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.