औरंगाबाद : शैक्षणिक हक्क कायद्या नुसार खाजगी शाळेत २५ टक्के जागा राखीव असतात. सध्या हि प्रक्रिया मंदावलेली दिलेत आहे. प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत फक्त ४० टक्के प्रवेश निश्चित झाला आहे. निवड झालेल्या पालकांना आज प्रवेशासाठी शेवटची संधीचा आहे.
जिल्ह्यात ६०३ शाळांत ३६२५ आरटीई जागेंसाठी ३४७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात अली. त्यासाठी पालकांना ११ ते ३० जून दरम्यान शाळेत प्रवेश निश्चिती होती. त्यांनतर हि प्रवेशाची गती न वाढल्यामुळे या मध्ये मुदतवाढ करून ९ जुलै करण्यातली होती. तरी देखील गुरुवार पर्यंत १६२७ प्रवेश झाले. तसेच एकहजार विषयार्थ्यांनी शाळेत तात्पुरते प्रवेश घेतले.
कोरोनामुळे पालकांना प्रवेश घेण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन पुन्हा मुदतवाढ देता येऊ शकते, असे शिक्षण विभागातील अधिकार्यांनी सांगितले मात्र, हि पालकानासाठी प्रवेश घेण्याची शेवटची संधी असू शकते.




