दिवसभरत सातारा १०७ तर खटाव तालुक्यात ८१ बाधीत, जिल्ह्यात सोमवारी 474 पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात १०७ तर खटाव तालुक्यात ८१ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यात 474 जण बाधित तर १ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात 293, 371, 495, 365, 407 तर सोमवारी आलेल्या रिपोर्टमध्ये 474 बाधित आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा 64980 आकडा झाला. तर जिल्ह्यात एकूण 59543 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 1902 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्ह्यात 3065 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस कोरणा बाधित यांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. जिल्ह्यातील सातारा १०७, खटाव ८१, कोरेगाव ४३, वाई ४१, कराड ३१, पाटण २९, माण २९, फलटण २८, जावली ३१, महाबळेश्वर ३२, खंडाळा १२ व इतर १० असे ४७४ बाधीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like