Tokenization of cards : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून RBI च्या CoF Card Tokenization च्या नियमात बदल होणार आहे. RBI ने यावेळी सांगितले की, या बदलानंतर कार्डधारकांचे ट्रान्सझॅक्शन्स आता आधी पेक्षा आणखी सुरक्षित होतील. या नवीन बदलानुसार जेव्हा ग्राहक कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (POS) किंवा App द्वारे ट्रान्सझॅक्शन करतील तेव्हा सर्व डिटेल्स एनक्रिप्टेड कोडमध्ये सेव्ह केले जातील.

New Debit/Credit Card Rules from October 1, 2022: Implementation of Card Tokenization

टोकनायझेशन सिस्टीम बाबत जाणून घ्या

या नवीन नियमांतर्गत RBI ने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांचा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा स्टोअर करण्यास मनाई केली आहे. यानुसार आता पेमेंट कंपन्यांना कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याला टोकन असे म्हंटले जाईल. हे टोकन युनिक असतील आणि एकापेक्षा जास्त कार्डांसाठी तेच टोकन वापरता येतील. यानंतर आता ऑनलाइन पेमेंटसाठी थेट कार्ड वापरण्याऐवजी एक युनिक टोकन वापरावे लागेल. Tokenization of cards

The coming disruption over card tokenization | Mint

टोकन सिस्टीममुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील : RBI

आता ही नवीन सिस्टीम लागू केल्याने फसवणुकीच्या घटना कमी होतील असे RBI चे म्हणणे आहे. सध्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती लीक झाल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या नवीन सिस्टीममुळे अशा फसवणुकीच्या घटना कमी होण्याची अपेक्षा RBI ने व्यक्त केली आहे. Tokenization of cards

सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्स, मर्चंट स्टोअर्स आणि Apps इ. ठिकाणी ग्राहकांनी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर कार्डचे डिटेल्स स्टोअर करतात. अनेक प्रकरणांमध्ये, व्यापाऱ्यांकडे कार्ड डिटेल्स ग्राहकांसमोर ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. हे डिटेल्स लीक झाल्यास ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमामुळे हे धोके कमी होतील. Tokenization of cards

Card Tokenization India: Card Tokenisation to be implemented from January 2022, no need to provide card details to e commerce merchant | बिना कार्ड नंबर डाले हो जाएगा पेमेंट! 1 जनवरी 2022

को-ब्रँड्सना माहिती देता येणार नाही

या नवीन नियमां नुसार आता कार्डद्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनशी संबंधित माहिती ब्रँडिंग पार्टनरला देता येणार नाही. ज्याचा परिणाम आता को-ब्रँडेड कार्ड सेक्शनमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलवर होऊ शकेल. कारण या कंपन्याकडून या ट्रान्सझॅक्शनवर आधारित विविध ऑफर ग्राहकांना दिल्या जातात. Tokenization of cards

विविध भागधारकांकडून मिळालेल्या सूचना लक्षात घेऊन, RBI ने कार्ड-ऑन-फाइल डेटा स्टोअर करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. नंतर ती पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता ही मुदत आणखी वाढवण्याचा RBI चा विचार नाही. याचा अर्थ आता पेमेंट कंपन्यांना 30 सप्टेंबर 2022 नंतर लोकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा डेटा हटवावा लागेल. Tokenization of cards

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonman/English/Scripts/FAQs.aspx?Id=2917

हे पण वाचा :

ग्राहकांचा डेटा विकून IRCTC कमावणार कोट्यवधी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा

Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये एका वर्षासाठी फ्री कॉलिंग सोबत मिळवा 24GB डेटा !!!