मुबई : हॅलो महाराष्ट्र – टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या लोव्हलिना बोरगोहेनने (Lovlina Borgohen) बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच बीएफआयवर मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोव्हलिना (Lovlina Borgohen) ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारी पहिली आसामी महिला आहे. लोव्हलिना सध्या बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी तयारी करत आहे. बीएपआय आपल्याविरुद्ध घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप लोव्हलिनाने (Lovlina Borgohen) केला आहे. लोव्हलिनाने ट्विटरच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत.
https://twitter.com/LovlinaBorgohai/status/1551520397832720385
काय म्हणाली लोव्हलिना बोरगोहेन?
‘माझा छळ केला जात आहे, हे मी आज खूप खेदाने सांगत आहे. ऑलिम्पिकमध्ये मला मेडल जिंकवण्यात मदत करणाऱ्या कोचना बाहेर काढण्यात आलं, याचा माझ्या ट्रेनिंग प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. यातली एक कोच द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी संध्या गुरूंगजी आहे. दोन्ही कोचना ट्रेनिंग कॅम्पमध्ये येण्यासाठी विनवणी करावी लागली, यानंतर उशीरा त्यांना प्रवेश देण्यात आला,’ असे लोव्हलिनाने (Lovlina Borgohen) आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. तसेच ‘या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मला खूप गोष्टींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे माझा मानसिक छळ होत आहे. सध्या माझी कोच संध्या गुरूंगजी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या बाहेर आहे, तिला आत प्रवेशही मिळत नाहीये. स्पर्धा सुरू व्हायला 8 दिवस शिल्लक असताना माझं ट्रेनिंग थांबवण्यात आलं आहे.’
‘माझ्या दुसऱ्या कोचना भारतात पाठवण्यात आलं आहे. खूप विनंती केल्यानंतरही मला मानसिक छळाचा सामना करावा लागत आहे. मी माझ्या खेळावर लक्षं कसं केंद्रीत करू? हा प्रश्न मला पडला आहे. याचमुळे मागच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्येही माझा खेळ खराब झाला. या राजकारणामुळे मला कॉमनवेल्थमधला माझा खेळ खराब करायचा नाही. माझ्या देशासाठी मी हे राजकारण मोडून काढेन आणि पदक मिळवेन,’ असा विश्वासदेखील लोव्हलिनाने (Lovlina Borgohen) व्यक्त केला आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये लोव्हलिनाने 69 किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास घडवला होता. विजेंदर सिंग आणि मेरी कॉमनंतर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी ती तिसरी बॉक्सर आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर