#TokyoOlympics : तो किस्सा ऐकून पंतप्रधान मोदींनी थोपटली कुस्तीपटू बजरंग पुनियाची पाठ; पहा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) पदक मिळवून दिल्यानंतर नुकतीच सर्व पदक विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी भारताला कुस्तीमध्ये कास्य पदक मिळवून देणारा बजरंग पुनियाची पंतप्रधानांनी पाठ थोपवली.

पायाला दुखापत झाली असताना देखील उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधानांनी पुनिया यांचे केले कौतुक. पायाला दुखापत असताना पट्टी काढून टाकून खेळण्याचा निर्णय कसा घेतला असा प्रश्न मोदी यांनी विचारला असता पुनिया यांनी तो सर्व किस्सा पंतप्रधानांना सांगितला.

दरम्यान, मी स्पर्धेत केवळ मेडल जिंकण्यासाठीच गेलो होतो. तेव्हा पायाला दुखापत असतानाही मला मेडल हवेच होते. मेडल मिळालं नाही तर माझ्या खेळाचा काहीच उपयोग होणार नव्हता. त्यामुळे आपण पायाची पट्टी काढून खेळण्याचा निर्णय घेतल्याचं पुनिया यांनी यावेळी बोलताना सांगितले.