जुन्नर प्रतिनिधी । सतिश शिंदे
दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पश्चिम, पूर्व भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो शेतीमध्ये केली असून, टोमॅटोला या वर्षी ५०० रू क्रेटला किंमत झालेली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही, मात्र शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाला पाणी देत आहेत. मात्र उन्हामुळे काही ठिकाणी बागा जळत आहेत. त्यातच आज नारायणगाव मार्केटला पश्चिम तसेच पूर्व भागातून टोमॅटो मोठ्या आयात होत आहेत. मात्र कमी पाण्यामुळे व दुष्काळाच्या गडद छायेमुळे टोमॅटो पिकाला धोका निर्माण होताना दिसतो.
तसेच कमी पाणी मिळाल्यामुळे टोमॅटो फुगण्याची क्षमता कमी होते, किड लागते तसेच उन्हामुळे
टोमॅटो लाल पडून अतिशय कोमेजून जातात. यातूनही शेतकरी या पिकाची मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन औषधांची फवारणी करतात. यावर्षी कांदा उत्पादनाबरोबरच टोमॅटोदेखील मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी केली आहेत, मात्र पाणी नसल्यामुळे काही भागात बागा जळत आहेत. शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत.
टोमॅटोच्या एका २० किलोच्या क्रेटला ५०० ते ५५० रू भाव असल्याने निर्यातदेखील शहरात तसेच बाहेर देशात होत आहे.