मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय … Read more

Budget 2021: शेतकर्‍यांना जाहीर केला जाऊ शकेल इन्सेंटिव, पंतप्रधान कुसुम योजनेचा होणार विस्तार !

नवी दिल्ली | 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अनेक खास घोषणा करू शकतील. 2021 च्या अर्थसंकल्पात, सौर पंप योजनेच्या विस्तारासह सरकार आर्थिक मदतीची रक्कमही वाढवू शकते. पीएम कुसुम योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020 च्या … Read more

पीएम किसान योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना मिळाले पैसे, माहिती अधिकारातून मिळाली माहिती

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 20.48 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले गेले आहेत. माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत मागविलेल्या माहितीला उत्तर म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी किंवा ज्यांच्याकडे … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

PM Kisan Samman Nidhi: 31 मार्चपर्यंत तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत!

नवी दिल्ली । तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. अन्यथा पैसा थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. अन्य राज्यात … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी! आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहामाहीत कृषी निर्यातीत झाली वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान कृषी उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.4 टक्के अधिक कृषी उत्पादनांची देशातून निर्यात झाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 53,626.6 कोटी रुपयांची … Read more

‘शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’; युवक काँग्रेस चा निर्धार

पुणे प्रतिनिधी | शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ३ कृषी विधेयके राज्यसभेत मोदी सरकारनेहुकूमशाही पद्धतीने रेटून नेली ,याचा तीव्र निषेध महाराष्ट्र युवक काँग्रेसने  केला आहे.  ‘कृषीसंस्कृती कार्पोरेट  मित्रांच्या  दावणीस बांधू नका’ असा इशारा देत ‘  शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’,असा निर्धार आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी  पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे . कृषी विधेयके मांडताना मोदी सरकारने संसदीय पद्धतीला फाटा दिला. मतदानाची विनंती फेटाळली .या विधेयकावर … Read more

‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू … Read more