हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे चांगली थंडी पडत आहे. अशा या जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यात अनेकजनांप्रमाणे तुम्हीही फिरण्याचा प्लॅन करत असाल ना? याचे उत्तर जर हो असेल तर तुमच्यासाठी कोकणातील दहा टॉपची ठिकाणी आम्ही घेऊन आलो आहोत. या ठिकाणा तुम्ही नक्कीच भेट द्या. या ठिकाणी अथांग असा समुद्र, शांत वातावरण आणि मनसोक्त फिरण्याची ठिकाणं आहेत.
कोकणात जाण्यासाठी सर्वांत उत्तम महिना कोणता असेल तर म्हणजे जानेवारी व फेब्रुवारी महिना होय. यावेळी त्या याठिकाणचे वातावरण खूप छान असते. अशा वातावरणात शाळांच्या सहलीही मोठ्या संख्येने भेट देण्यासाठी जातात. या ठिकाणच्या काही मोठ्या बीचवर वॉटर स्पोर्ट, उंट, घोडे, बोटींग असे मनोरंजनाची साधने उपलब्ध केलेली आहेत. अशी कोकणातील दहा टॉपची ठिकाणे आहेत.
1) अलिबाग : Alibaug
अलिबाग हे समुद्र किनारा असलेलं ठिकाण. मुंबईपासून १०० किमी अंतरावर अलिबाग हे सुंदर बीच, कनकेश्वर किल्ला यासाठी ओळखले जाते. या ठिकाणी वरसोली, काशीद, नागावचे बीच अशी शांत व सुंदर ठिकाणे आहेत. शिवाय सतराव्या शतकातील कुलाबा फोर्ट व अलिबाग पेण रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर, अलिबाग किल्ला, चौल, बिर्ला मंदिर, मुरुड जंजिरा किल्ला हे सर्व सुद्धा अलिबाग पासून जवळच आहेत. अलिबागचा मुख्य समुद्रकिनारा अतिशय आकर्षक नसला तरी बहुतेक लोक सभोवतालच्या किनार्याकडे जातात. रिसॉर्टपासून साध्या घरगुती राहण्याच्या सोईपर्यंत अनेक ठिकाणी राहण्याची सोय आहे.मुंबई आणि पुण्याहून या ठिकाणी जाण्यासाठी साधारणत ३ तास इतका वेळ लागतो.
2) गणपतीपुळे : (Ganapatipule)
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील गणपतीचे देऊळ हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा मिळतील. येथील समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स सुद्धा खेळता येतात. या ठिकाणी सुन्दर समुद्र किनाऱ्यासह जवळच लाईटहाऊस, आरे वारे बीच, वेळणेश्वर, जयगड किल्ला, पावस आणि केशवसुतांचे जन्मगाव मालगुंड सुद्धा बघण्यासारखे आहेत. गणपतीपुळेच्या दक्षिणेस असलेला आरेवारे बीचचा समुद्रकिनारा पण खूप छान आहे. तेथील दृश्य खूपच मनमोहक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हा समुद्र किनारा असून पर्यटकांचं विशेष आकर्षणाचा ठिकाण आहे. मुंबईपासून सुमारे ३४० किलोमीटर इतके अंतर असून 8 तास इतका वेळ याठिकाणी येण्यासाठी लागतो.
3) काशीद : Kashid Beach
अलिबागपासून थोडे पुढे गेल्यास आपल्याला काशीद समुद्रकिनारा लागतो. या ठिकाणी असलेल्या लांबच लांब समुद्रकिनार्यावर कॅस्युरीना वृक्ष, स्नॅक स्टॉल आणि हॅमक्स अशा वृक्षांच्या रांगा आहेत. या परिसरात एक अभयारण्य आणि जंजिरा किल्ला आहे. सुट्टी नसताना, समुद्र किनारा रिकामा असताना त्याचा वेगळाच प्रभाव पर्यटकांवर पडतो. घरगुती राहण्याची सोय आणि काही प्रमाणात हॉटेल या भागात आहेत. मुंबईपासूनचे साधारण १३० किलोमीटर इतके अंतर असून ४ तास इतका वेळ लागतो.
4) दिवेआगर : Diveagar Beach
दिवेआगर हा फारसा प्रसिद्ध नसलेला समुद्रकिनारा आहे. हा मुंबईपासून फारसा दूर नाही. पण तिथे जाण्यासाठीचा मार्ग घनदाट जंगलातून आहे. जंगलातून मार्ग काढत जाताना एक मोठा समुद्र किनारा तलागतो त्याला दिवसागर असे म्हणतात. या याठिकाणी एक्सोटिका बीच रिसॉर्ट, नारळाच्या झुडपात इंद्रधनुष्य कॉटेज अशी हॉटेल्स आहेत. जी स्वस्त आणि चांगली आहेत. शहरामध्ये सोनेरी मूर्ती असलेले गणपती मंदिर होते, परंतु २०१२ मध्ये येथील मूर्तीची चोरी झाली. तेव्हापासून तिथे चांदीची मूर्ती ठेवण्यात आली. मुंबईपासून सुमारे २०० किलोमीटर अंतर आहे. तर या याठिकाणी जाण्यासाठी ५ तास इतका वेळ लागतो.
5) श्रीवर्धन : Shreevardhan Beach
श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोंकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. श्रीवर्धन समुद्रकिनार्याचे वैशिष्ट्य म्हणजे बसण्यासाठी केलेली बाकडी, लाइट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ सार्वजनिक शौचालये आहेत. श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो.सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. दांडा येथुन हरिहरेश्वरला होडिने जाणे एक सुखद अनुभव आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर प्रसिद्ध आहे.सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे. हरिहरेश्वर ते पुणे १७५ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून). हरिहरेश्वर ते मुंबई हे अंतर २०० किलोमीटर आहे. पुणे व मुंबई येथे विमानतळ आहेत. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव. माणगाव व महाड ही दोन्ही ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावर आहेत. हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे.
6) हरिहरेश्वर : Harihareshwar
कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा. तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे.
7) मुरुड : Murud Beach
मुरुडचा समुद्र किनारा हा कोकणपट्टीवरील खूप मोठा समुद्र किनारा आहे. हॉटेल आणि घरगुती राहण्याच्या सोई तिथे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण या किनार्यावरचं म्हणजे डॉल्फिन आहे. विशेषत: थंडीत ते वारंवार दिसतात. उत्तरेला पुढे थोडेसे हरणेचा बीच आहे. तिथे माशांची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तिथूनच सुवर्णदुर्ग किल्ल्याला देखील जाऊ शकता. हे ठिकाणसुद्धा पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. मुंबईपासून २४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा ६ तास वेळ लागतो.
8) तारकरली, मालवण आणि देवबाग : Devbagh
तळ कोकणातील म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पर्यटकांचं विशेष आवडतं ठिकाण आहे. पण इकडे जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. तारकर्ली किनार्यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होतेया बीचवर गेल्यावर गोव्याची आठवण येते. देवबाग येथे एक बेट तयार करून तिथे वॉटर स्पोर्ट आहेत. त्यामुळे समुद्र किनार्यावरील शांतता अढळ राहिली आहे. मुंबईपासूनचे ५०० किलोमीटर मात्र असून १७ तास इतका वेळ या ठिकाणी जाण्यासाठी लागतो.
9) भोगवे समुद्रकिनारा : Bhogwe Beach
वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील समुद्रकिनाराही विलोभनीय आहे. भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो, हे आगळे वेगळे वैशिष्टय आहे. लांबच्या लांब पसरलेली पांढर्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनार्यावरील माड पोफळीच्या बागा यांमुळे या समुद्रकिनार्यावरील निसर्गसौंदर्य अधिक देखणे बनले आहे. कोचरे गावाच्या हद्दीत भोगवे समुद्र किनार्यालगतच्या एका टेकडीवर रम्य समुद्रकिनार्यावरच ऐतिहासिक निवती किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलला छोटासा किल्ला आहे. या ठिकाणी डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत डॉल्फिनचे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. भोगवेचा समुद्र किनारा हा तसा निर्जन भाग आहे. कार्ली नदी या अरबी समुद्राला मिळते. मुंबईपासूनचे सुमारे ५० किलोमीटर हे ठिकाणी असून तब्बल १७ तास इतका वेळ या ठिकाणी जाण्यासाठी लागतो.
10) वेंगुर्ला : Vengurla Beach
वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. गोव्यापासून अर्ध्या तासावर वेंगुर्ला बीच आहे. लाइट हाउस, जेटी म्हणजे जिथे मच्छीमार मोठ्या प्रमाणावर होते हा परिसर ‘बर्न आयलँड’ म्हणूनही ओळखला जातो. जिथे पक्षी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे हे गाव. या गावाची ओढ शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांना असते. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा. वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. मुंबईपासून ५२० किलोमीटर स्तर असून प्रवासासाठी १० तास इतका वेळ लागतो.